NMC Nashik News
NMC Nashik News esakal
नाशिक

NMC News : ‘मुकणे’ च्या धर्तीवर दारणातून थेट पाइपलाइन; पंधराव्या वित्त आयोगातून नियोजन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक रोड भागाचा वाढता विस्तार लक्षात घेता भविष्यात मोठ्या प्रमाणात पाणी पुरवावे लागणार आहे. त्यामुळे भविष्यातील गरज लक्षात घेऊन नाशिक रोड भागासाठी दारणा धरणातून थेट पाइपलाइन योजना राबविली जाणार आहे.

त्यासाठी प्राथमिक व्यवहार्यता अहवाल तयार केला जात आहे. जवळपास तीनशे कोटी रुपयांची योजना राबविण्यासाठी केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगाकडून निधीची मागणी केली जाणार आहे.

मुकणे धरणातून थेट पाइपलाइन योजनेच्या धर्तीवर दारणा थेट पाइपलाइन योजना राबविली जाणार आहे. (Nashik Road Direct Pipeline Scheme Pipeline scheme will be implemented directly from Darna Dam Planning from 15th Finance Commission Nashik News)

नाशिक महापालिका हद्दीत नाशिक रोड विभाग येतो. भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठा आहे. नांदूर नाका ते जेल रोडमार्गे देवळाली कॅम्प हद्दीतील सहा नंबर नाका, चेहेडी नाका, वडनेर दुमाला, जयभवानी रोड, नाशिक- पुणे महामार्गावरील उपनगर इथपर्यंत नाशिक रोड विभागाची हद्द आहे. या विभागाला दारणा धरणातून पाणीपुरवठा होतो.

त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दोनशे दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले जाते. मात्र दूषित पाण्यामुळे दारणा धरणातून पूर्ण क्षमेतेने पाणी उचलले जात नाही. नाशिक रोड विभाग हा रेल्वे स्टेशन, तसेच सरकारी कार्यालयामुळे महत्त्वाचा आहे. भविष्यात येथे रेल्वे स्थानकाबरोबरच मल्टी मॉडेल हब तयार होत आहे.

नाशिक- पुणे सेमी हायस्पीड तसेच महामार्गाचे विस्तारीकरण होत असल्याने नाशिक रोडचे महत्त्व वाढत आहे. येथे नागरी वस्तीदेखील झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची मोठी गरज येथे लागणार आहे.

त्यामुळे महापालिकेने आतापासूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन असे केले आहे. याचाच एक भाग म्हणून मुकणे थेट पाइपलाइन योजनेच्या धर्तीवर दारणा भेट पाइपलाइन योजना राबविण्यासाठी प्राथमिक व्यवहार्यता अहवाल तयार केला जात आहे. पंधराव्या वित्त आयोगातून दारणा थेट पाइपलाइन योजनेसाठी निधीची मागणी केली जाणार आहे.

जलशुद्धीकरण केंद्राला जोडणार

दारणा नदीवर महापालिकेने चेहेडी येथे पंपिंग स्टेशनची उभारणी केली आहे. मात्र, चेहेडी येथून पाणी उचलणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे धरणातून थेट पाइपलाइनद्वारे नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणून तेथून नाशिक रोड विभागासाठी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. जवळपास आठ ते दहा किलो मीटर लांबीची पाइपलाइन असेल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"नाशिक रोडसाठी पाणीपुरवठा योजना राबविणे गरजेचे आहे. यापूर्वी अपुरा व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने महापालिकेला सांगून गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा सुरू केला. महापालिकेने थेट पाइपलाइनचा प्रस्ताव सादर केल्यास केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू"

- ॲड. राहुल ढिकले, आमदार

"मुकणेच्या धर्तीवर नाशिक रोडसाठी दारणा धरणातून थेट पाइपलाइन योजना अमलात आणण्याचे नियोजन आहे. त्यासाठी प्राथमिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून प्रस्ताव सादर केला जाईल."

- उदय धर्माधिकारी, अधीक्षक अभियंता, महानगरपालिका.

अशी आहे मुकणे योजना

मुकणे धरणातून शहरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी २०१६ मध्ये थेट पाइपलाइन योजना राबविण्यात आली.

नेहरू पुनरुत्थान योजनेंतर्गत प्रकल्प राबविण्यात आला असून, अठराशे मिलिमीटर व्यासाची अठरा किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकणे, विल्होळी नाका येथे ४०० दशलक्ष लिटर क्षमेतेचा जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी करणे, मुकणे धरणात कॉपर डॅम उभारण्यासाठी इलेक्ट्रिकल कामे करण्यासाठी २६६ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT