RTE admission sakal
नाशिक

नाशिक : आरटीई प्रवेशाची यादी जारी, पण...

ऐन सोडतीवेळी संकेतस्‍थळ ठप्प; पालकांचा मनस्‍ताप

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शासकीय स्‍तरावरील तंत्रज्ञानाच्‍या मागासलेपणाची अनुभूती पुन्‍हा एकदा अनुभवायला मिळाली. शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये २५ टक्‍के राखीव जागांसाठी सोमवारी (ता. ४) सोडत जाहीर होणार होती. मात्र, ऐन यादी प्रसिद्ध होण्यावेळीच संकेतस्‍थळ ठप्प झाले. सायंकाळी उशिरापर्यंत संकेतस्‍थळ कार्यरत होऊ शकले नाही. प्रवेशाची यादी प्रसिद्ध झाली असल्‍याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले. रात्री आठच्‍या सुमारास संकेतस्‍थळ सुरळीत झाल्‍याने माहिती उपलब्‍ध झाली. मात्र, अनेक पालकांना यादी पाहण्यास न मिळाल्‍याने संताप व्‍यक्‍त करण्यात आला.

यापूर्वी गेल्‍या वर्षी अकरावीच्‍या सीईटी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होताच संकेतस्‍थळ ठप्प झाल्‍याचा अनुभव पालकांना आला होता. त्यातच शासकीय पातळीवरील तांत्रिकदृष्ट्या मागासलेपणाबाबत सर्वत्र टीकेची झोड उठली होती. यातून धडा न घेतल्‍याने सोमवारी (ता. ४) घटनेची पुनरावृत्ती झाली. शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये दुर्बल घटकांसाठी २५ टक्‍के राखीव जागांसाठी निवड यादी जाहीर होणार होती. दुपारी चारची वेळ दिली असल्‍याने अनेक पालकांनी या वेळेदरम्‍यान संकेतस्‍थळाला भेट दिली. त्‍यामुळे संकेतस्‍थळ ठप्प झाले. वारंवार तपासणीसाठी संकेतस्‍थळाला भेट देणाऱ्या पालकांना उशिरापर्यंत काहीही हाती लागले नाही. त्‍यामुळे वैतागलेल्‍या पालकांनी अखेर शोध थांबविला. दरम्‍यान, रात्री आठच्‍या सुमारास संकेतस्‍थळ कार्यान्‍वित झाल्‍याने माहिती उपलब्‍ध होऊ शकली.

साडेचार हजार विद्यार्थ्यांचा जिल्‍हा यादीत समावेश

रात्री उशिरा उपलब्‍ध माहितीनुसार जिल्‍ह्यातील चार हजार ५१३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. चार हजार ९२७ जागांसाठी ही निवड झाली आहे, तर राज्‍याचा विचार केल्‍यास उपलब्‍ध असलेल्‍या एक लाख एक हजार ९०९ जागांसाठी ८८ हजार १३४ विद्यार्थ्यांची निवड झाली.

पालकांसाठी अशा आहेत सूचना

प्रवेशपात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदविलेल्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील. मात्र, फक्त एसएमएसवर अवलंबून न राहता पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही, याची माहिती मिळेल. लॉटरी लागलेल्या पालकांनी अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढण्यासाठी आरटीई पोर्टलवर जाऊन ऑनलाइन ॲप्लि‍केशन या टॅबवर क्लीक करावे. अर्ज क्रमांक आणि पासवर्ड प्रविष्ट करून लॉगइन करावे. यानंतर ॲडमिट कार्ड पर्यायावर क्लीक करत अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी. प्रवेश घेण्यासाठी या पत्राची प्रत आणि आवशयक कागदपत्रे घेऊन नजीकच्या पडताळणी केंद्रावर जावे. प्रवेश निश्चित करताना रिसीट प्राप्त करून शाळेत जावे. अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढण्याबाबत अडचण आल्यास नजीकच्या पडताळणी केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pusad Gun Firing : पुसद मध्ये गोळीबार, चाकूहल्ल्यात दोघे जखमी; घटनेने खळबळ

FIFA सामन्यात दिसलेलं 'ग्रीन व्हिसल' नेमकं आहे तरी काय? Pain कमी करणाऱ्या या उपकरणाची जगभर होतेय चर्चा!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Khadakwasala Dam : धरण क्षेत्रात यंदा पावसाची मोठी तफावत; सरासरी ९५.८४ टक्के घट, पाणीसाठ्याबाबत चिंता

Land Acquisition : माऊलींच्या पालखीसाठी अवघ्या तीन महिन्यात भूसंपादन; इमारत पाडण्याचे काम सुरू

SCROLL FOR NEXT