RTE Admission  esakal
नाशिक

RTE Admission : ‘आरटीई’ संकेतस्‍थळ ठप्पने चिंता; प्रक्रिया विलंबामुळे पालकवर्ग संतप्त

Nashik News : शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्‍के जागांवर मोफत प्रवेशाच्‍या प्रक्रियेला पुन्‍हा एकदा ‘ब्रेक’ लागला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्‍के जागांवर मोफत प्रवेशाच्‍या प्रक्रियेला पुन्‍हा एकदा ‘ब्रेक’ लागला आहे. न्‍यायप्रविष्ट प्रकरणामुळे सोडतीचा तपशील उपलब्‍ध करून दिलेला नाही. त्‍यातच संकेतस्‍थळ ‘देखभाल दुरुस्‍ती’च्या नावावर ठप्प झाले असल्‍याने पालकांच्‍या पोटात गोळा आल्‍याचे पाहायला मिळत आहे. शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस उरलेले असताना प्रवेशप्रक्रियेत होत असलेल्‍या विलंबाबाबत चिंता व्‍यक्‍त केली जात आहे. (RTE admission Process outage)

शिक्षण विभागातर्फे शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील बालकांना शिक्षणाची संधी उपलब्‍ध करून दिलेली आहे. त्‍यानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्‍या प्रवेशाची प्रक्रिया राबविली जाते; परंतु वारंवार अडथळे येत असल्‍याने ही प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झालेली आहे.

यापूर्वी शिक्षण विभागाने प्रक्रिया हाती घेतली होती. मात्र, तेव्‍हा स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था, अनुदानित शाळांचा समावेश असल्‍याने प्रवेशासाठी फारसा प्रतिसाद मिळाला नव्‍हता. मात्र, न्‍यायालयाच्‍या हस्‍तक्षेपानंतर ही प्रक्रिया स्‍थगित करीत इंग्रजी माध्यमाच्‍या खासगी शाळांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. (latest marathi news)

यानंतर विद्यार्थी, पालकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. मात्र, प्रकरण न्‍यायप्रविष्ट असताना, प्रवेशासाठीच्‍या सोडतीचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्‍यातच प्रवेशासंबंधीचे संकेतस्‍थळ ‘साईट इज अंडर मेंटेनन्‍स’ असे दाखविले जात असल्‍याने विद्यार्थी, पालकांची घालमेल वाढली आहे.

साधारणतः येत्‍या आठवड्यात शाळांची घंटा वाजणार असून, लागलीच अध्ययन प्रक्रियेला सुरवात होईल. दुसरीकडे आरटीई अंतर्गत प्रवेशनिश्‍चितीसाठी कागदपत्र पडताळणीसह अन्‍य प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्‍यासाठी भरपूर वेळ लागेल. अशात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT