Nashik 
नाशिक

Nashik Band Hindu Morcha: नाशिक सकल हिंदू समाजाच्या मोर्चादरम्यान तणाव, परिस्थिती नियंत्रणात

Nashik Sakal Hindu Samaj Rally 16 August: शुक्रवारी दुपारी १२ ते २ या वेळेत शहरात ठिकठिकाणी हातात फलक घेऊन हिंदू समाजातर्फे निदर्शने करण्यात आली.

रोहित कणसे

Nashik Band Update 16 August 2024 Sakal Hindu Morcha

नाशिक : बांगलादेशमधील हिंदूवरील अत्याचार आणि मंदिरामधील मोडतोडीच्या निषेधार्थ नाशिकमध्ये शुक्रवारी बंदची हाक देण्यात आली. सकल हिंदू समाजातर्फे काढण्यात आलेल्या मोर्चामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून शहरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिसांचार सुरू आहे. यादरम्यान हिंदू बांधवांवर होत असलेले हल्ले, मंदिरांची मोडतोड केली जात आहे. यादरम्यान बांगलादेशी सैन्यदलाने हिंदूंच्‍या रक्षणाचे आश्वासन दिले असले, तरी केंद्र शासनाने त्यांच्‍यावर अवलंबून न राहता हिंदू समाज व मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. यादरम्यान बांगलादेशमधील हिंसेचा निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी (ता.१६) जिल्‍हा बंदची हाक देण्यात आली होती.

आज आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चावेळी काही नागरिकांकडून दुकाने बंद करण्यास नकार दिल्याने दोन गटात वाद झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांकडून परिसरात अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. तसेच यावेळी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे अवाहन देखील केले जात आहे.

Nashik

दरम्यान नाशिक शहरामधील दोन्ही हिंदू-मुस्लिम समाजातील युवकांना सांगणे आहे की कोणीही कायदा हातात घेऊ नये. सर्वांनी शांतता ठेवून पोलिसांना सहकार्य करावे. यामधून कुठलेही हानी होणार नाही, कोणाच्याही धार्मिक स्थळावर घाला घालू नये अशी विनंती यावेळी सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

Nashik

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आणखी एक चूक अन् Shreyas Iyer वर बंदी! CSK विरुद्धच्या सामन्यांनंतर IPL ची कडक कारवाई; २४ लाखांचा दंड

ट्रक चोरीला गेला... पोलिसांनाही सापडेना, पण कर्जाचे हप्ते सुरू... अखेर तरुणाने संपवले जीवन, आईची मागितली माफी

Latest Marathi News Live Update : सांगलीत हद्दपार गुंडाकडून रुग्णवाहिकेची तोडफोड

Shaktipeeth Highway Update : शक्तिपीठ महामार्गाचा नकाशा बदलला! आता सातारा जिल्ह्यातील 'या' भागातून सुसाट धावणार गाड्या; जयकुमार गोरेंनी दिली महत्त्वाची अपडेट

CSK vs PBKS: ऋतुराज गायकवाडने चेन्नईच्या सलग दुसऱ्या पराभवासाठी कोणाला धरलं जबाबदार? म्हणाला, 'कधी कधी आमच्याकडून...'

SCROLL FOR NEXT