A red device that fell from space on Dr. Harish Rokde's farm. esakal
नाशिक

Nashik News : अवकाशातून पडले शास्त्रीय कोरियन उपकरण! अंदरसूलला शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Latest Nashik News : उपकरणाचा आवाज व चमकणाऱ्या लाल दिव्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, याबाबत डॉ. रोकडे यांनी तलाठी कमलेश पाटील यांना माहिती दिली.

सकाळ वृत्तसेवा

अंदरसूल : येथील शेतकरी डॉ. हरीश रोकडे यांच्या शेतात गुरुवारी रात्री अवकाशातून कोरियन बनावटीचे शास्त्रीय उपकरण पडले. उपकरणाचा आवाज व चमकणाऱ्या लाल दिव्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, याबाबत डॉ. रोकडे यांनी तलाठी कमलेश पाटील यांना माहिती दिली. ()Nashik scientific Korean device fell from space in Andarsul)

गुरुवारी (ता. १९) साडेसातच्या सुमारास येथील शेतकरी डॉ. रोकडे यांच्या शेतात अवकाशातून काहीतरी उपकरण पडताना शेतकऱ्यांनी पाहिले. या उपकरणातून लाल रंगाचा प्रकाश दिसत असून, किरकिर असा भयंकर आवाज येत असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत शेतकरी रोकडे यांनी तलाठी कमलेश पाटील यांना आमच्या शेतात अवकाशातून काहीतरी उपकरण पडलेले आहे.

त्याचा आवाज येत असून, लाल रंगाचा प्रकाशही दिसत आहे, अशी माहिती दिली. तलाठी पाटील यांनी तत्काळ रोकडे यांच्या शेतात जाऊन शेतात पडलेल्या या उपकरणाची पाहणी केली असता शेतात पडलेल्या शास्त्रीय उपकरणावर कोरियन अक्षरात लिहिल्याचे दिसून आल्याने तलाठी पाटील यांनी तहसीलदार आबा महाजन यांना या संदर्भातील माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT