‘शिवसेनाप्रमुख’ करणार प्रचार..! sakal
नाशिक

नाशिक : ‘शिवसेनाप्रमुख’ करणार प्रचार..!

बाळासाहेबांची छबी असलेले विवेक देवरे सेना उमेदवारासाठी रिंगणात

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको : तीन वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या छबीसारखे दिसणारे विवेक देवरे यांना ‘सकाळ’ने प्रकाशझोतात आणताच राज्यातील शिवसैनिकांनी त्यांना भेटण्यासाठी एकच गर्दी केल्याचे सकारात्मक चित्र बघायला मिळाले होते. श्री. देवरे आता आपल्या छबीचा उपयोग येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी करणार आहेत.

‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ अशी साधी घोषणा जरी कानावर ऐकू आली तरी कुणाच्याही अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही, एवढे मात्र नक्की. याचा अनुभव आजपर्यंत लाखो-करोडो लोकांनी घेतला असून, आजही काही जण तो घेत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची एक छबी बघण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय उसळल्याचे आतापर्यंत सर्वांना बघायला मिळाले आहे. आता तो सुवर्णयोग पुन्हा येणे शक्य नसले तरी त्यांची छबी असलेले काही जण आपणास अधूनमधून बघायला मिळतात. अशावेळी साहजिकच कुणाच्याही तोडून निघते की, ते बघा ते बाळासाहेबांसारखे दिसतात म्हणून ! नाशिक शहरातील सिडको येथे वास्तव्यास असलेले असेच एक म्हणजे विवेक देवरे हे त्यापैकीच एक होय!

४३ वर्षीय विवेक देवरे मूळचे मालेगाव तालुक्यातील सोयगाव येथील. त्यांचे प्राथमिक शिक्षण मालेगावला झाले. पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण पेठे विद्यालयात झाले. केटीएचएम महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण प्राप्त केले. आयटीआयमध्ये आर्किटेक्चर ड्राफ्ट्समनचा कोर्स पूर्ण केला. सध्या ते सिडकोत आई- वडील, पत्नी व दोन मुलांसमवेत राहतात. वडील ‘बीएसएनएल’चे निवृत्त कर्मचारी आहेत. आपण बाळासाहेबांसारखे दिसतो, अशी जाणीव त्यांना प्रथम त्यांच्या पत्नीने करून दिली.

त्यानंतर सुरू झाला खऱ्या अर्थाने बाळासाहेबांसारखा दिसण्याचा त्यांचा प्रवास. याच वेशभूषेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी व इतर शिवसेनेच्या नेते व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या सर्वांनी त्यांचे तोंडभरून कौतुकही केले. बाळासाहेबांसारखा दिसण्याचा शिवसेना पक्षाला राजकीय फायदा व्हावा, अशी देवरे यांची मनोमन इच्छा असून, ते येणाऱ्या महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे ते सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 4th T20I : संजू सॅमसन बाकावरच... दुखापतीमुळे भारतीय संघात करावे लागले दोन बदल; भारताने टॉस जिंकला

China Shoe Factory Fire: बूट कारखान्यात भीषण आग! २८ कामगारांचा होरपळून मृत्यू; थरारक व्हिडिओ समोर, कुठे घडली घटना?

Marathi News Updates: राज्यासह देशात विदेशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Maharashtra Rain: पश्चिम घाटात यंदा पावसाचा विक्रम! पहिल्या आठ दिवसांत इतका पाऊस का झाला? हवामान तज्ज्ञांनी सांगितले मोठे कारण

महाराष्ट्रात UCC लागू करण्याची तयारी! महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय; ७ सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन

SCROLL FOR NEXT