Simhastha Kumbh Mela esakal
नाशिक

Simhastha Kumbh Mela 2027: त्र्यंबकेश्‍वर कुंभमेळ्याचा आराखडा 503 कोटींचा! मूळ आराखड्याची ‘अ’ अन ‘ब’ वर्गात विभागणी

Latest Nashik Kumbh Mela 2027 News : कामांच्या कालमर्यादेनुसार ‘अ’ आणि ‘ब’ या दोन वर्गांत त्यांची विभागणी झाली असून, दीर्घकालीन कामांचा ‘अ’ वर्गात समावेश असल्याने त्यांना लवकर मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्‍वर नगरपालिकेने ५०६ कोटींचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला आहे. पुढील आठवड्यात हा प्रारूप आराखडा अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर होईल. विशेष म्हणजे कामांच्या कालमर्यादेनुसार ‘अ’ आणि ‘ब’ या दोन वर्गांत त्यांची विभागणी झाली असून, दीर्घकालीन कामांचा ‘अ’ वर्गात समावेश असल्याने त्यांना लवकर मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. (Simhastha Kumbh Mela 2027 Plan 503 Crores)

नाशिक व त्र्यंबकेश्‍वरमध्ये २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळा म्हणजे जिल्ह्याच्या विकासाची पर्वणी असते. या निमित्ताने नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर नगरपालिका व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लावण्यावर भर दिला जातो. त्यादृष्टीने आवश्‍यक कामांचा प्रारूप आराखडा नगर परिषद तयार करीत आहे. त्र्यंबकेश्‍वरचे प्रांताधिकारी आर. पी. चौहान यांनी या आराखडा बनविण्याचे काम जलदगतीने हाती घेतले आहे.

त्र्यंबकेश्‍वर कुंभमेळ्याच्या दृष्टीने प्रथमच ‘डीपीआर’ तयार झाला. त्यात कामांची दोन वर्गांत विभागणी केली आहे. दीर्घकालीन कामांचा ‘अ’ वर्गात समावेश केला असून, कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी करायची कामे ‘ब’ वर्गात समाविष्ट केली आहेत. ‘डीपीआर’ला हिरवा कंदील मिळाल्यावर त्यात आवश्‍यक बदल करून मंजुरीसाठी सादर करण्याची प्रक्रिया जलदगतीने सुरू आहे. (latest marathi news)

"सिंहस्थ कुंभमेळ्याचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे लवकरच तो सादर करण्यात येईल. अंतिम मंजुरी मिळाल्यावर त्यातील बाबी सविस्तरपणे सांगता येतील."- श्रेया देवचक्के, मुख्याधिकारी, त्र्यंबकेश्‍वर नगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT