Infestation of armyworm on maize crop esakal
नाशिक

Crop Damage : सिन्नरला मका पिकावर 'लष्करी' चा प्रादुर्भाव; तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना

Crop Damage : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात जोमदार वाढलेल्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला असून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पिकांच्या नुकसानीचा सामना करावा लागणार असे चित्र आहे.

अजित देसाई

Crop Damage : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात जोमदार वाढलेल्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला असून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पिकांच्या नुकसानीचा सामना करावा लागणार असे चित्र आहे. सिन्नर तालुक्यात यंदा आशादायक पाऊस असल्याने रब्बी हंगामात मका व सोयाबीन या पिकांच्या लागवडीखाली क्षेत्र वाढणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मृगाचा पेरणी योग्य पाऊस झाल्याने जूनच्या मध्यातच बऱ्यापैकी क्षेत्रात पेरण्या उरकल्या होत्या. (Sinnar taluka rigorous maize crop was attacked by armyworm )

त्यानंतर अधून मधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरींनी पिकांना जीवदान दिले आहे. पूर्व भागातील शेतकऱ्यांना अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा असली तरी जेमतेम पडणाऱ्या पावसावर शेती शिवार हिरवागार दिसत असून दोन वर्षांच्या नुकसानीची भर यंदाच्या हंगामात भरून निघेल अशी अपेक्षा आहे. मात्र यंदाच्या हंगामात मका पिकावर लष्करी अळीने आक्रमण केले आहे. त्यामुळे कमरेपर्यंत वाढलेली पिके अळीचे भक्षस्थानी पडून कोमेजून गेली आहेत. लष्करी अळी ही कीड मका पिकाच्या झाडाची पाने कुरतडून खाऊन टाकते. (latest marathi news)

तसेच झाडाच्या गाभ्यापर्यंत जाऊन संपूर्ण नुकसान करते. अळीचा प्रादुर्भाव झालेली झाडे जनावरांना देखील चारा म्हणून खाऊ घालता येत नाहीत. पूर्व भागातील वावी, पिंपरवाडी, मिरगाव, मलढोण, दूसंगवाडी या भागात मोठ्या क्षेत्रावर मका पेरणी करण्यात आली आहे. मात्र, लष्करी अळीच्या संकटामुळे ही पिके धोक्यात सापडली आहेत. लष्करी अळीपासून पिके वाचवण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे.

मोठ्या पावसाची प्रतीक्षा

पूर्व भागातील सर्वच ठिकाणी पाणी पातळी खाली गेली आहे. विहिरींना जेमतेम पाणी असून, नदी बंधारे अद्याप कोरडीठाक आहेत. पूर्व भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जुलै महिन्यात पावसाने हुलकावणी दिली आहे. जेमतेम बरसणाऱ्या सरी पिकांसाठी जीवदान ठरत असल्या तरी पाणीटंचाईचे सावट दूर करण्यासाठी पाऊस जोरदार बरसण्याची वाट शेतकरी बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

Latest Marathi News Live Updates: अमळनेरात पुराचा कहर; एकाचा मृत्यू, २४ तासांनंतरही शोध निष्फळ

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Mumbai News: मुंबईत घर घेणं महागलं! नागरिकांच्या खिशाला फटका, 'इतक्या' टक्क्यांनी किमतीत वाढ, अहवाल समोर

सोहम बांदेकर अडकणार लग्नबंधनात! 'ही' मराठी अभिनेत्री होणार आदेश अन् सुचित्रा बांदेकरांची सून?

SCROLL FOR NEXT