Sinnar Industrial Estate Extended Area, Sinnar Industrial Estate Map & Sinnar Industrial Estate Phase 1 esakal
नाशिक

Nashik: सिन्नर MIDCचे ग्रहण संपणार कधी? उद्योगाच्‍या स्‍वप्‍नपूर्तीत बाबूशाहीची अडकाठी; वसाहतीच्या विकासाकडे सोयीस्‍कर कानाडोळा सुरू

Latest Nashik News : केवळ तालुकाच नव्‍हे, तर सिन्नर हे संपूर्ण जिल्ह्यातील उद्योगांचे केंद्र ठरू शकते; परंतु महामंडळ स्‍तरापासून उद्योग मंत्रालयापर्यंत वेगवेगळे विषय रखडून ठेवल्‍याने उद्योगांच्‍या विकासाची चाके रुतली आहेत.

अरुण मलानी

सिन्नर : जिल्ह्यातील सर्वांत मोठे औद्योगिक क्षेत्र म्हणून विकासाची सिन्नरमध्ये क्षमता आहे; परंतु विशाल उद्योगसमूह होण्याच्‍या स्‍वप्‍नपूर्तीत बाबूशाहीचे धोरण आडकाठी ठरत आहे. माळेगाव, मुसळगाव, मापारवाडीसह ‘इंडियाबुल्‍स’च्‍या ताब्‍यातील जागेची गोळाबेरीज केल्‍यास जवळपास चार हजार एकर औद्योगिक क्षेत्रात अनेक मोठ्या कंपन्‍या डौलाने उभ्या राहू शकतात; परंतु औद्योगिक विकास महामंडळाच्‍या अधिकाऱ्यांपासून तर उद्योगमंत्र्यांचे उदासीन धोरण स्‍वप्नभंग करणारे ठरते आहे. (Sinner MIDC problems eye towards development of colony)

माळेगावला अभियांत्रिकी क्षेत्रातील दिग्‍गज कंपन्‍या कार्यरत असून, औषधनिर्माणशास्‍त्र, रासायनिक क्षेत्राशी निगडित उद्योग उभारलेले आहेत. यापैकी अनेक उद्योगांना विस्‍तार करायचा असून, काही नवीन कंपन्‍यांना कारखाने उभारायचे आहेत; परंतु अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत असल्‍याने उद्योजक मेटाकुटीला आले आहेत. केवळ तालुकाच नव्‍हे, तर सिन्नर हे संपूर्ण जिल्ह्यातील उद्योगांचे केंद्र ठरू शकते; परंतु महामंडळ स्‍तरापासून उद्योग मंत्रालयापर्यंत वेगवेगळे विषय रखडून ठेवल्‍याने उद्योगांच्‍या विकासाची चाके रुतली आहेत.

क्षेत्रनिहाय विस्‍तार असा

माळेगावचे क्षेत्र एक हजार ४५० एकर असून, आणखी ३९० एकर जागा अधिग्रहीत केलेले आहे. मुसळगावला सुमारे ३९० एकर जागा असून, मापारवाडीला ५०० एकर जागा औद्योगिक वसाहतीसाठी प्रस्‍तावित आहे. ‘इंडियाबुल्‍स’च्‍या एकूण पंचवीसशे एकर जागेपैकी आठशे एकरांवर प्रकल्‍प असून, उर्वरित सोळाशे एकर जागा मिळावी, अशी उद्योजकांची मागणी आहे. तसे झाल्‍यास जिल्‍हापातळीवर सिन्नर उद्योगांचे केंद्र म्‍हणून नावारूपाला येऊ शकेल.

ट्रक टर्मिनल्स ठरतेय दिवास्‍वप्‍न

औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. त्‍यामुळे ही वाहने उभी करण्यासाठी ट्रक टर्मिनल्‍स अपेक्षित आहे; परंतु त्‍यासाठीची प्रस्‍तावित जागा अन्‍य कंपनीला वाटप केली. किमान दुसऱ्या जागेवर ट्रक टर्मिनल होणे अपेक्षित असताना, प्रत्‍यक्षात एका कंपनीबाहेर रस्‍त्‍याच्‍या कडेला वाहने उभी केली जात असल्‍याचे आढळले. त्‍यामुळे उद्योजकांना ट्रक टर्मिनल्‍स दिवास्‍वप्‍न वाटू लागले आहे. (latest marathi news)

उद्योगांना हव्‍या या पायाभूत सुविधा...

- माळेगाव, मुसळगाव एमआयडीसी लिंक रोडची उभारणी

- नियोजित नाशिक-पुणे हायस्‍पीड रेल्‍वे प्रकल्‍पाची गरज

- सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गाची हस्‍तांतरण प्रक्रिया पूर्ण व्‍हावी

- सिन्नर-शिर्डी पूर्वीचा जुना रस्‍ता ब्‍लॅकस्‍पॉट; १५२ अपघातांत ८२ मृत्‍यू

- अपघात रोखण्यासाठी दुभाजकांसह रस्‍त्‍याचे चौपदरीकरण गरजेचे

- सिन्नर घाट चढल्‍यावर नवीन जे ब्‍लॉककडे जाण्यासाठी नाही

- पुलाखालून विरुद्ध बाजूने रस्त्याने जावे लागत असल्‍याने अपघाताचा धोका

- या भागात सर्व्हिस रोडच्‍या प्रस्‍तावास मान्‍यता मिळणे गरजेचे

- अतिरिक्‍त सिन्नर औद्योगिक क्षेत्रातील गुळवंच शिवारात रस्‍ते उभारावेत

"मापारवाडीच्या जमिनीचे अधिग्रहण सुरू असून, काही जागांच्‍या अधिग्रहणात कायदेशीर बाबींची पूर्तता केली जात आहे. ‘इंडियाबुल्‍स’च्‍या जागेसंदर्भात संबंधित कंपनीने याचिका दाखल केली असल्‍याने इतर उद्योगांना जागा उपलब्‍ध करण्यास तांत्रिक अडचणी आहेत."

- नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी.

"ग्रामीण भागात उद्योग चालविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था, शासनाच्‍या स्‍तरावर मागण्यांसंदर्भात तातडीने निर्णय झाल्‍यास उद्योगवृद्धीला चालना मिळेल. पायाभूत सुविधांपासून तर अन्‍य आवश्‍यक बाबींची पूर्तता व्‍हावी, इतकी माफक मागणी आहे." - नामकर्ण आवारे, अध्यक्ष, ‘स्‍टाईस’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tobacco Excise Duty: सिगारेट आणि पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! नवा कर लागू होणार; पण कधीपासून? तारीख आली समोर

T20 World Cup 2026 साठी कांगारुंचा मास्टर प्लॅन! स्पर्धासाठी १५ जणांचा संघ जाहीर; कमिन्सचे पुनरागमन, पण कर्णधार कोण?

Maharashtra SSC Exam Schedule 2026: तयारीला लागा! SSC बोर्ड परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर, पाहा पहिला कोणता पेपर

धक्कादायक! आईशी भांडून घरातून निघालेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन तास गाडीत किंचाळत होती, पण कोणीच...

Thane Fire News: नववर्षाची सुरुवात आगीच्या घटनांनी; परिसरात धुराचे मोठे लोट; नागरिकांमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT