Ananda Chaudhary's farm house damaged. esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain : डांग सीमावर्ती भागात वळिवाचा तडाखा; वीज पडून रेडा मृत्यूमुखी, म्हैस जखमी

Nashik News : तालुक्यातील पिंपळसोंड, उंबरपाडा (पि), तातापाणी, गोणदगड, डांग सीमावर्ती भागात गुरुवारी (ता. १६) दुपारी साडेचारच्या सुमारास वळिवाच्या पावसाने तडाखा दिला.

सकाळ वृत्तसेवा

सुरगाणा : तालुक्यातील पिंपळसोंड, उंबरपाडा (पि), तातापाणी, गोणदगड, डांग सीमावर्ती भागात गुरुवारी (ता. १६) दुपारी साडेचारच्या सुमारास वळिवाच्या पावसाने तडाखा दिला. आंबा व घरांचे नुकसान झाले. मालगोंदा तातापाणी येथे वीज पडून रेडा मृत्यूमुखी पडला, तर म्हैस जखमी झाली. वादळी वारा, वीजांचा कडकडाटसह तासभर जोरदार पाऊस झाला. (Surgana Unseasonal Rain in Dang area)

मालगोंदा येथील शेतकरी गोपाळ चौधरी यांनी दुपारी शेतातील आंब्याच्या व वडाच्या झाडाखाली सावलीत जनावरे बांधली होती. दुपारी सव्वाचार ते साडेचारच्या सुमारास अचानक वीज पडल्याने रेडा जागीच मृत्यूमुखी पडला, तर दुधाळ म्हैस जखमी झाली. काही जनावरे वाचली. वादळामुळे गोणदगड येथील शेतकरी आनंदा चौधरी यांच्या घराचे पत्रे, वासे उडाल्याने नुकसान झाले.

उंबरपाडा (पि) येथील माजी सैनिक शिवराम चौधरी, मोतीराम चौधरी, रंगू चौधरी यांच्या फळबागेचे नुकसान झाले, तर पिंपळसोंड येथील लहानू चौधरी, काशिनाथ चौधरी, चंदू चौधरी यांच्या फळबागेचे नुकसान झाले. पिंपळसोंड येथील लहानू चौधरी यांची फळबाग गुजरात राज्यातील ठेकेदारांबरोबर सुमारे दीड लाखाचा व्यवहार झाला होता.

मात्र, पावसामुळे त्यांच्यावर रडण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांपूर्वी उंबरठाण, बेहुडणे, चुली, देवीपाडा, निंबारपाडा या भागांत पावसाचा फटका बसल्याने घरांचे व फळबागेचे नुकसान झाले होते. रोजच पाऊस वादळी वाऱ्यासह हजेरी लावत असल्याने आंबा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी भगवान भुसारे यांनी तत्काळ भेट देऊन रेड्याचे विच्छेदन केले. (latest marathi news)

तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे यांनी कृषी सहाय्यक हरी गावित, कृषी पर्यवेक्षक विलास भोये यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तहसीलदार रामजी राठोड यांनी तलाठी वैभव वाघ, कृषी मंडलाधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

रेडा नांगरटीसाठी वापरात असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. रेड्याची किंमत ३० ते ३५ हजार रुपये आहे. खुंटविहीरचे सरपंच आनंदा झिरवाळ, मोतीराम वाघमारे, परशुराम चौधरी, रतन चौधरी आदींनी वीज पडल्याच्या ठिकाणी पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT