Nashik swvrn Palace Jewelers worker thift and fraud owner 72 lakh sakal
नाशिक

नाशिक : स्वर्ण पॅलेसला ७२ लाखांचा चुना

दोन विश्‍वासू कामगारांकडून मालकाचा विश्वासघात

सकाळ वृत्तसेवा

धुळे : येथील आग्रा रोडवरील स्वर्ण पॅलेस ज्वेलर्समध्ये दोन विश्‍वासू कामगारांनी मालकाला सोने, चांदीचा अपहार करत सुमारे ७२ लाखांना चुना लावला. या प्रकरणी मालक प्रकाश जोरावरमल चौधरी (रा. नित्यानंद नगर, नटराज थिएटरमागे) यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात आज रात्री साडेनऊला संशयित कामगारांविरूद्ध गुन्हा दाखल केला.

प्रकाश चौधरी व सरदारमल चौधरी ही भावंडे स्वर्ण पॅलेस ज्वेलर्सचे कामकाज पाहतात. त्यांना एक ते नऊ एप्रिलदरम्यान सोनेचादींच्या स्टॉकमध्ये तफावत असल्याचे तपासणीवेळी जाणवले. स्टॉकची देखरेख ठेवण्यासाठी चौधरी यांनी शांतीराम हमीराम कलबी (रा. मंडार, ता. रेवदर, जि. सिरोही, राजस्थान) याची नेमणूक केली होती.

त्याने मालकाचा विश्‍वास संपादन केला होता. मात्र, कलबी व त्याचा साथीदार किशोर नटवरलाल कोळी (रा. पिथापुरा, ता. रेवदर, जि. सिरोही, राजस्थान) यांनी विश्‍वासाचा गैरफायदा घेत सरासरी ५१ लाखांचे सोन्याचे दागिने, २१ लाखांचे चांदीचे दागिने लंपास केले. त्यांनी दागदागिन्यांचा अपहार व फसवणूक केल्याने मालक प्रकाश चौधरी यांनी या दोन कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

दरम्यान, या प्रकरणी दुकानातील एक कामगार हितेश दिनेशकुमार जोशी याने १३ एप्रिलला आत्महत्या केली असून त्या दिवसापासून संशयित शांतिलाल कलबी फरार झालेला आहे. त्यापूर्वी त्याने साथीदार कामगार किशोर कोळी याच्या मदतीने स्वर्ण पॅलेस ज्वेलर्समधून ७१ लाख ६४ हजार ४०० रुपयांचे दागिने काढून अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: 500 च्या जळलेल्या नोटा कुणाच्या होत्या? Justice Yashwant Varma Cash कांडाची पूर्ण Timeline

Mumbai High Court Order : जयगड बंदरातील आमिराती गॅसवाहू जहाजाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; साडेनऊ कोटी भरा, नाहीतर गॅस रिकामा करा!

Pune Tunnel: पुण्यात आणखी एक बोगदा! सुतारदरा ते पाषाण भुयारी मार्गासाठी लवकरच सल्लागार नियुक्त, महापालिकेचा मोठा प्लॅन

Latest Marathi News Live Update : पुण्यात वारजे कर्वेनगर भागात पडलेल्या प्रचंड खड्डे दुरुस्ती साठी मनसे तर्फे वारजे क्षेत्रीय प्रमुखांना तुकाराम मुंडे यांची प्रतिमा भेट

Gokul Election Update : 'गोकुळ'ची बहुचर्चित प्रारूप मतदार यादी जाहीर; 4,897 संस्थांना मतदानाचा हक्क, 'इतक्या' संस्थांना बसला फटका!

SCROLL FOR NEXT