Saptashrungi Devi Wani gad esakal
नाशिक

Nashik News: चैत्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाची यंत्रणा सज्ज! भाविक, व्यावसायिकांना खबरदारीच्या सूचना

Nashik News : सप्तशृंगगडावरील चैत्रोत्सवाला बुधवार (ता.१७) पासून सुरुवात झाली आहे. सप्तशृंगगडावर पायी व रथ यात्रेद्वारे जाणाऱ्या भाविकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : सप्तशृंगगडावरील चैत्रोत्सवाला बुधवार (ता.१७) पासून सुरुवात झाली आहे. सप्तशृंगगडावर पायी व रथ यात्रेद्वारे जाणाऱ्या भाविकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शहरातून मोठ्या संख्येने भाविक जुन्या आग्रा महामार्गावरुन जातात.

भाविकांना प्रवास सुलभ व्हावा, यातून कुठलाही वादविवाद होवू नये, त्यांना सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी पोलिस प्रशासनाने विविध उपाययोजना करतानाच भाविक व व्यावसायिकांना खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. जुना आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे निगराणी राखण्यात येणार असल्याचे अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. (Nashik system of police administration ready in background of Chaitrotsav Precautions for Devotees Professionals marathi news)

श्री. भारती म्हणाले, की शहरातील विविध सण उत्सवा संदर्भात यापुर्वी सुसंवाद हॉलमध्ये शांतता समिती व विविध घटकांच्या बैठका पार पडल्या आहेत. जुन्या महामार्गावर यापूर्वी चौकसभा घेऊन मार्गदर्शन केले आहे. शहरवासियांनी गेल्या दोन दशकांपासून शांततेची कुस धरली आहे.

त्याला एखाद दोन विघ्नसंतोषी व समाजकंटकांमुळे गालबोट लागू नये यासाठी पोलिस प्रशासनासह भाविक, व्यावसायिक, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते सर्वांनीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. गडाकडे जाणाऱ्या भाविकांचे शहरात हिंदू-मुस्लिम बांधव स्वागत करतात.

त्यांना चहा, पाणी, सरबत, नाश्‍ता दिला जातो. यामुळे शहराचे नाव व सामाजिक सलोखा वाढतो. सण, उत्सव, यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर सोशल मिडीयावर चुकीचा संदेश प्रसारीत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा श्री. भारती यांनी दिला आहे. (latest marathi news)

पोलिस प्रशासनाच्य उपाययोजना अशा

* जुन्या महामार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही

* साध्या वेशातील पोलिसांचे समाजकंटक, गुन्हेगारांवर खास लक्ष

* सोशल मिडीयावरील प्रत्येक हालचालीवर सायबर सेल, पोलिस लक्ष ठेवून

* जुन्या महामार्गासह मोसम पुल चौक, सटाणा रस्त्यावर दुकानदारांनी अतिक्रमण करु नये.

* यात्रोत्सव काळात दुकाने, आस्थापनांसमोर चारचाकी व दुचाकी वाहने लावू नयेत.

* गडावरील भाविकांना शितपेय, खाद्यपदार्थ वाटप करणाऱ्या स्टॉलधारकांनी रहदारीस अडथळा होईल अशा ठिकाणी स्टॉल लावू नयेत.

* सोशल मीडियावर अफवा पसरवू नयेत.

* धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य करु नये.

* बेवारस वस्तू दिसल्यास पोलिसांना कळवावे.

* मद्यपान, नशा करणाऱ्यांसंदर्भात तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT