Shantaram Parrot Gangurde esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : उतार्यावरील नोंदीच्या दुरुस्तीसाठी लाच घेणारा तलाठी जेरबंद; ‘लाचलुचपत’ची वणीच्या कार्यालयात कारवाई

Latest Bribe Crime : शेतजमिनीच्या उतार्यावरील आकाराच्या नोंदी दुरुस्ती करण्यासाठी १० हजारांची लाच स्वीकारणार्या कसबे वणीचा (ता. दिंडोरी) तलाठ्याला जेरबंद करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शेतजमिनीच्या उतार्यावरील आकाराच्या नोंदी दुरुस्ती करण्यासाठी १० हजारांची लाच स्वीकारणार्या कसबे वणीचा (ता. दिंडोरी) तलाठ्याला जेरबंद करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (ता. २६) कारवाई केली असून, याप्रकरणी वणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांताराम पोपट गांगूर्डे (५१, रा. रेणुका हाईटस्‌, ध्रुवनगर, मोतीवाला मेडिकल कॉलेजसमोर, सातपुर) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. ( Talathi jailed for accepting bribes to correct entries on transcripts in vani )

कसबे वणी येथील तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, कसबे वणी येथील त्यांच्या मालकीच्या शेतजमीन गट नं. ६१७ यावर त्यांना कर्ज काढावयाचे होते. त्यासाठी ते कसबे वणीचे तलाठी गांगूर्डे यांना भेटले. त्यावेळी फेरफार नोंदी दिंडोरी तहसील कार्यालयात मिळतील असे गांगुर्डे यांनी सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदाराने तहसील कार्यालयात त्यांना पाहीजे असलेल्या नोंदी मिळाल्या.

परंतु सध्याच्या तीन नोंदी त्यांना वणीचे तलाठीकडे मिळतील असे सांगितले. त्यामुळे तक्रारदार पुन्हा गांगूर्डे यांना बुधवारी (ता. २५) भेटले असता त्यांनी, तुम्ही विकत घेतलेल्या शेतगट नंबर ६१७ चे उताऱ्यावरील शेतजमीन आकाराबाबतच्या नोंदी चुकीच्या झाल्या आहेत. त्या दुरुस्तीसाठी १० हजारांच्या लाचेची मागणी करीत, त्या दुरुस्ती करून फेरफार नोंदी देतो असे सांगितले.

याबाबत तक्रारदाराने ‘लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर गुरुवारी (ता. २६) तलाठी कार्यालयात सापळा रचला होता. लाचखोर गांगुर्डे यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडून १० हजारांची लाच स्वीकारली. त्यावेळी दबा धरून असलेल्या पथकाने गांगुर्डे यांना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी वणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘लाचलुचपत’च्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस नाईक विनोद चौधरी, अनिल गांगोडे, परशुराम जाधव यांच्या पथकाने सदरची कामगिरी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : जम्मू-पठाणकोट महामार्गाजवळील सहर खड नदीवरील खचला

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

Ganesh Festival 2025 : खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या; पूजा आणि सजावटीच्या साहित्यासाठी पुणेकरांची लगबग

SCROLL FOR NEXT