The counting of votes for the election of Nashik Division Teachers Constituency has started today at 8 am in Nashik. esakal
नाशिक

Teacher Constituency Vote Counting : शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीला नाशिकमध्ये सुरुवात

Vote Counting : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी नाशिकमध्ये आज सकाळी ८ वाजता सुरुवात झाली आहे.

संतोष विंचू

नाशिक : बहुचर्चित नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी नाशिकमध्ये आज सकाळी ८ वाजता सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम ३० टेबलवर ५० मतपत्रिकांचे गठ्ठे बनविले जात आहेत. नाशिक विभागातून या निवडणुकीत २१ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. (Teacher Constituency Vote Counting Begins )

महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे, महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात प्रामुख्याने तिरंगी लढत होत आहे. या निवडणुकीत 64 हजार 848 मतांमधतून अगोदर अवैद्य मते बाजूला काढून एकूण वैध मते ठरवले जाणार आहेत. त्यातून विजयाचा कोटा निश्चित करून मतमोजणीला सुरुवात होईल. (latest marathi news)

सुरुवातीला पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी होणार आहे. याप्रमाणे कोटा पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या मतांची उलट्या क्रमाने मतमोजणी होणार आहे. सर्वात अगोदर कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजयी घोषित केला जाईल. सद्या ५० मतांचे गठ्ठे बनविण्याचे काम सुरू असून अंदाजे १२ वाजेनंतर मतमोजणीला सुरुवात होईल असा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : पेट्रोल, डिझेल अन् खतांचा तुटवडा भासेल अशा अफवा विरोधकांनी पसरवल्या; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींचा इशारा

El Nino Alert : पुढील वर्षाच्या मॉन्सूनबाबत हवामान विभागाचे मोठे संकेत! प्रशांत महासागराचे तापमान होणार कमी; 'एल निनो' ओसरणार? 'नोआ'च्या अहवालाने वाढवली चिंता

Census 2026: जनगणनेसाठी ४० प्रश्‍नांची सूची; स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातिगणनाही होणार

ASIA CUP 2026: जेमिमा रॉड्रिग्स आशिया कप आणि आशियाई खेळांमधून बाहेर; BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ धडाकेबाज फलंदाजाला मिळाली संधी

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

SCROLL FOR NEXT