Nashik Teacher Constituency Vote Counting esakal
नाशिक

Nashik Teacher Constituency Vote Counting : 3 मतपेटीत निघाल्या जादा मतपत्रिका! गठ्ठे बनवण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू

Teacher Constituency Vote Counting : शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीत तब्बल तीन मतपेटीत जादा मतपत्रिका आढळल्याने मतमोजणी प्रक्रियेला उशीर होत आहे.

संतोष विंचू

नाशिक : शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीत तब्बल तीन मतपेटीत जादा मतपत्रिका आढळल्याने मतमोजणी प्रक्रियेला उशीर होत आहे. बहुचर्चित नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी नाशिकमध्ये आज सकाळी ८ वाजता सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम ३० टेबलवर ५० मतपत्रिकांचे गठ्ठे बनविले जात आहेत. या दरम्यान ३० टेबलवर तीस मतपेट्या घेऊन गठ्ठे बनवत असताना सर्वात अगोदर चोपडा येथील मतपेटीत तीन पत्रिका ज्यादा आढळल्या होत्या. ( Teacher Constituency Vote Counting making process start slowly )

आता दुसऱ्या फेरीत निफाड व येवला येथील मतपेटीत एक-एक मत पत्रिका ज्यादा आढळली आहे. या टेबलवर किमान तीन ते चार वेळेस सर्व मतपत्रिका मोजल्या गेल्याने सुमारे अर्धा ते पाऊण तास वाया गेला असून यादरम्यान सर्व प्रक्रिया ठप्प होती.

तीन ते चार वेळेस मोजणी करूनही मते जुळत नसल्याने यावेळी सर्व उमेदवारांचा प्रतिनिधींना एकत्रित करत निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी या पत्रिका बाजूला ठेवून त्यावर शेवटी निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.

या मतपेटीतील मतपत्रिका व निवडणूक विभागाकडे असलेले मतपत्रिकेचे क्रमांक जुळवून मग त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. क्रमांक न जुळणाऱ्या मतपत्रिका बाद केल्या जातील असे सांगण्यात आले. दरम्यान,आता तिसऱ्या फेरीत ५० मतपत्रिकाचे गठ्ठे बनवण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

Akkalkot FoodSafety: अक्कलकोटमध्ये गुटखा, अन्नभेसळ, अशुद्ध पाणी व निकृष्ट दूधविक्रीवर धडक कारवाईची नागरिकांची जोरदार मागणी

Paithan Irrigation Project: ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेतील रखडलेले पूल; रस्ते खोदकामामुळे शेतकरी व वाहनधारकांचे हाल

Video : 20 लाखांची गाडी पण मनाने भिकारी! डिझेल भरल्यानंतर ड्रायवर पंपावरून पळाला, पेट्रोल भरणारा कासावीस होऊन मागे धावला अन्...

SCROLL FOR NEXT