Police Action esakal
नाशिक

Nashik Police : शहरातून दहा सराईत गुंडांची तडीपारी! आयुक्तांचा दणका; परिमंडळ दोनच्या उपायुक्तांची कारवाई

Nashik News : पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालय हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीविरोधात आक्रमक पावले उचलण्यास सुरवात केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police : अंबड, सातपूर परिसरामध्ये दहशत माजवून भाईगिरी करणार्या दहा सराईत गुंडांवर शहर-जिल्हयातून तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आक्रमक भूमिका घेत दणका दिला आहे. (Nashik ten criminals tadipaar from city)

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालय हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीविरोधात आक्रमक पावले उचलण्यास सुरवात केली आहे. आगामी सणउत्सव आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर आयुक्तालयाकडून गुन्हेगारांविरोधात धडक कारवाईचा बडगा उगारला आहे.

त्याच अनुषंगाने परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांच्या आदेशान्वये दहा सराईत गुंडांची शहर - जिल्ह्यातून ३ महिने ते २ वर्षांसाठी तडीपारी करण्यात आलेली आहे. तडीपारी करण्यात आलेल्या गुंडांमध्ये सातपूर, अंबड आणि चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीतील गुंडांचा समावेश आहे. (latest marathi news)

यांना केले तडीपार

सातपूर पोलीस ठाणे : गोटीराम श्रावण कोरडे (४०, रा. महालक्ष्मी चौक, सातपूर), संजय सुकट चौहाण (३४, रा. विश्वासनगर, सातपूर), संदीप सुकट चौहाण (३४, रा. विश्वासनगर, सातपूर), समीर संतोष जोशी (२८, रा. निर्वती प्रभा सोसायटी, साळुंकेनगर, सातपूर), प्रवीण उर्फ पप्पू बुधा सूर्यंवंशी (२७, रा. श्रमिकनगर, सातपूर)

अंबड पोलीस ठाणे : विजय प्रल्हाद आव्हाड (२०, रा. मयुरी गार्डन, गणेश चौक, सिडको), अमोल सुधाकर नाईक (४२, रा. नाईक फार्म, पाटीलनगर, सिडको), अभिषेक उर्फ सनी हिरामण बच्छाव (२२, रा. श्री एम्पायर बिल्डिंग, फडोळ मळा, अंबड).

चुंचाळे पोलीस चौकी : दीपक अजय धोत्रे (२२, रा. घरकुल योजना, चुंचाळे शिवार), कुणाल रवींद्र पगार (२४, रा. शांतिनिकेतन अपार्टमेंट, दत्तनगर, चुंचाळे शिवार)

सहा महिन्यात ६६ तडीपार

परिमंडळ दोनच्या क्षेत्रातून गेल्या जानेवारी ते जून या सहा महिन्यांमध्ये ६६ सराईत गुंडाविरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, ८ रेकॉर्डवरील गुंडांवर स्थानबद्धतेची कारवाई करीत त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर, तीन गुन्ह्यांतील ३२ गुन्हेगारांविरोधात मोक्काअन्वये कारवाई करण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price Hike : सणासुदीच्या तोंडावर महागाईचा झटका! कमर्शियल LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Nuchinunde Recipe: इडली-वडा तर नेहमीच खाता; ट्राय करा कर्नाटकचं स्पेशल, प्रोटीनने भरपूर 'नुचिनुंडे'!

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

SCROLL FOR NEXT