Death News esakal
नाशिक

Nashik News : शहर परिसरात तिघांनी गळफास घेत संपवले जीवन; एकाचे अवघ्या ३ महिन्यापूर्वीच झाले लग्न

Nashik News : ३४ वर्षीय युवकाचे तर तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला असून, त्याच्या या कृत्यामुळे त्याच्या ७० वर्षीय वडिलांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आलेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहर परिसरामध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी गळफास घेत आत्महत्त्या केली आहे. या एका २९ वर्षीय महिलेसह दोघा पुरुषांचा समावेश आहे. ३४ वर्षीय युवकाचे तर तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला असून, त्याच्या या कृत्यामुळे त्याच्या ७० वर्षीय वडिलांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आलेली आहे. (Three people hanged themselves in city area)

पंचवटीतील टकलेनगरमध्ये विनोद शंकरराव देशमुख (५५, रा. साई विहार बंगलो, टकलेनगर, पंचवटी) यांनी रविवारी (ता. १४) सकाळी राहत्या बंगल्यातील खोलीत नायलॉन दोरीने गळफास लावून घेत आत्महत्त्या केली. आत्महत्त्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. अमित पवार यांच्या खबरीनुसार पंचवटी पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

गंगापूर शिवारातील पल्लवी निलेश जाधव (२९, रा. स्वामी दर्शन अपार्टमेंट, ध्रुवनगर) यांनी राहत्या घराच्या बेडरुममध्ये रविवारी (ता. १४) सकाळी पावणे बाराच्या सुामरास साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैदयकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.

(latest marathi news)

आत्महत्त्येमागील कारण अस्पष्ट असून, याप्रकरणी गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तर, जुने सिडकोतील इश्वर प्रभाकर मोरे (३४, रा. औंदुबर स्टॉप, जुने सिडको) यांनी रविवारी (ता. १४) रात्री सव्वा आठच्या सुमारास घरात बांधलेल्या झोळीच्या दोरीने गळफास लावून घेत आत्महत्त्या केली.

उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैदयकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. दरम्यान, इश्वर याचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले असून, आत्महत्त्येमागील कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी अंबड पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद केली असून, सहायक उपनिरीक्षक हारुण शेख हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: जगात पुन्हा युद्धाची चाहूल? अमेरिकेवर विश्वास नाही; युद्ध भडकू शकतं, इराणचा कडक इशारा, चिंता वाढली!

Multibagger Stock: लखपतींचे करोडपती बनवणारा स्टॉक! फक्त ₹1 लाखाचे झाले तब्बल ₹1.30 कोटी

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

Junnar 12th Result: जुन्नर तालुक्यात बारावीचा निकाल ९१.४९ टक्क्यांवर; मुलींची बाजी, सात कनिष्ठ महाविद्यालये शंभर टक्के

SCROLL FOR NEXT