NSK26H31273
नाशिक : राष्ट्रीय थ्रो-बॉल स्पर्धेत सहभागी झालेले अतुल बागूल, वैभव पवार.
--------
राष्ट्रीय थ्रो-बॉल स्पर्धेत नंदुरबारच्या खेळाडूंची चमक
अतुल बागूल, वैभव पवार यांच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राला तृतीय पारितोषिक
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ४ : नाशिक येथे झालेल्या कनिष्ठ राष्ट्रीय थ्रो- बॉल अजिंक्यपद स्पर्धेत नंदुरबार जिल्हा हौशी थ्रो- बॉल असोसिएशनचे अतुल बागूल व वैभव पवार यांनी महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर महाराष्ट्राच्या संघाने स्पर्धेत तृतीय पारितोषिक पटकावले. या यशामुळे नंदुरबारच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत देशातील विविध राज्यांतील संघांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र संघाकडून खेळताना अतुल बागुल व वैभव पवार यांनी कौशल्यपूर्ण खेळ, जिद्द, चिकाटी आणि सांघिक भावनेचे प्रभावी प्रदर्शन केले. दोन्ही खेळाडूंच्या योगदानामुळे महाराष्ट्र संघाला तृतीय क्रमांक मिळविण्यात मोलाची मदत झाली. या यशामागे दोन्ही खेळाडूंची मेहनत, नियमित सराव, शिस्त आणि प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. प्रशिक्षक शरीफ शेख व राज अहिरे यांनी खेळाडूंच्या तांत्रिक कौशल्यासोबतच शारीरिक क्षमता, सांघिक समन्वय आणि मानसिक तयारीवर विशेष भर दिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अतुल व वैभव यांना राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करता आली.
नंदुरबार जिल्ह्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या या यशामुळे जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नंदुरबार जिल्हा हौशी थ्रो-बॉल असोसिएशनचे सचिव धनराज अहिरे यांच्यासह असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अतुल बागूल व वैभव पवार यांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.