Governor Bhagatsinh Koshyari dancing on tribal dance during tribal pride day and state level tribal cultural festival esakal
नाशिक

Nashik Tribal Cultural Festival : आदिवासी नृत्यावर गावितांसह राज्यपालांनीही धरला ठेका!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी कायम चर्चेत असतात. मंगळवारी नाशिकमध्ये आदिवासी जनजातीय गौरव दिनानिमित्त राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपालांनी आदिवासी नृत्यावर ठेका धरला. त्यांच्याबरोबरच आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि आदिवासी शैलीसाठी नावाजलेले राष्ट्रवादीचे नेते तथा विधानसभेचे नरहरी झिरवाळ यांनादेखील नृत्याचा मोह आवरला नाही. त्यांनी देखील राज्यपालांसोबत आदिवासी नृत्यावर ठेका धरला. (Nashik Tribal Cultural Festival Tribal dance of governor Bhagat Singh koshyari along with narhari zirwal nashik news)

आदिवासी समुदायांच्या कलासंस्कृतीचे तसेच स्वातंत्र्यलढा व राष्ट्र निर्मितीमधील आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचे स्मरण व त्यांचा गौरव करण्यासाठी आदिवासी जनजातीय दिवस व राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन १५ ते १८ नोव्हेंबरदरम्यान गोल्फ क्लब मैदानावर होणार आहे. महोत्सवात राज्यभरातून आलेल्या आदिवासींच्या कलापथकांनी विविध कला सादर केल्या.

स्वागताप्रसंगी चंद्रपूर येथील आदिवासी बांधवांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्यात स्वतः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सहभागी झाले, केवळ सहभागी न होता त्यांनी आदिवासी संगीताच्या तालावर ठेका धरला. मंत्री गावित, आमदार झिरवाळ हे देखील नृत्यात सहभागी झाले. या कार्यक्रमात होळी नृत्य, लग्नातील पारंपरिक आदिवासी नृत्य, ढोल नृत्य, पारंपरिक आदिवासी नृत्याद्वारे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले. राज्यपालांनी राज्यभरातून आलेल्या कलापथकांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Result : अन्सर कीमध्ये ६०९, निकाल लागताच ५४० पण दोन तासांनी १६७ गुण; नीट निकालात गोंधळ, विद्यार्थीनीचे गंभीर आरोप

IND vs ENG: लॉर्ड्सवर रोहित-कोहली रचणार इतिहास! सचिन-द्रविडलाही मागे टाकत करणार '400'चा महाविक्रम

Latest Marathi News Live Update : शिक्षण, आरोग्यसेवा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत सरकार अपयशी - AICC सरचिटणीस सचिन पायलट

Beed News: भ्रष्टाचार उघड होताच रातोरात काम सुरू? बीडमध्ये नेमकं काय घडलं?

सोनम वांगचुक यांची प्रकृती कशी आहे? डॉक्टरांनी दिली अधिकृत माहिती, पत्नीचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT