vehicle checking file photo esakal
नाशिक

Nashik News : मालेगावला वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन! 25 हजारावर बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

Nashik News : मालेगाव शहरात बेशिस्त व मनमर्जीने वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांची संख्या लक्षणीय आहे.

जलील शेख

मालेगाव : शहरात बेशिस्त व मनमर्जीने वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांची संख्या लक्षणीय आहे. या बेशिस्त वाहनचालक यांना शिस्त लावण्याच्या उद्देशाने शहर वाहतूक शाखेने १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यत केलेल्या कारवाईत २४ हजार ५२४ वाहनांवर दंडात्मक कारवाई करत १ करोड ८९ लाख ७० हजार सहाशे रुपयांचा दंड वसुल केला. यात ९ लाख ८३ हजार तीनशे पन्नास रुपये रोख स्वरूपात जमा करण्यात आले. (Nashik Violation of traffic rules in Malegaon news)

शहरात येथे नवीन बसस्थानक, मौसम पूल, शिवतीर्थ यासह विविध भागात रिक्षा, दुचाकी रस्त्याचा कडेला लावलेली असतात त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होते. यातच वाहतूक विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने वाहनचालक हे आपल्या मर्जीने वाहतूक नियम धाब्यावर बसवीत वाहन चालविता.

या बेशिस्त वाहनचालक यांना शिस्त बसावी म्हणून १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ च्या काळात शहर वाहतूक शाखेने नो पार्किंग, विना लायसन्स, विना हेल्मेट, ट्रिपल सीट, सीटबेल्ट, अतिरिक्त प्रवासी, मोबाईलवर बोलणे, नोएंट्री यासह विविध वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यातून शासनाला सुमारे दीड कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. यात सर्वात जास्त नो पार्किंग व ट्रिपल सीट वाहनांवर कारवाया झाल्या आहे.

येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ), नवीन बसस्थानक,जुना बसस्थानक, सटाणा नाका, कुसुंबा रोड, करीम नाका, मौसम पूल, जिल्हा सत्र न्यायालय, स्टेट बँक चौक, किदवाई रोड, सरदार चौक, मोहम्मद अली रोड, रावळगाव नाका, कॉलेज स्टॉप, एकात्मता चौक, जुना-आग्रा महामार्ग ते दरेगाव पर्यत रस्त्याचा मधोमध व वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे. यात टेम्पो, क्रेन, अवजड ट्रक, ऑटो रिक्षा, खासगी बसेस, कार, प्रवासी रिक्षा, बस, शाळेची बस, ट्रक्टर ट्रक, दुचाकी, टॅक्सी यासह विविध वाहनांवर कारवाई झाली आहे.  (latest marathi news)

कमी वाहतूक पोलिसांवर शहराचा भार.

शहरात मौसम पूल, नवीन बसस्थानक जवळ उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. शिवतीर्थ,जुना-आग्रा रोड यासह विविध ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. शहरात वाढती लोकसंख्या बरोबरच वाहनांची संख्या ही वाढत आहे. दहा वाहतूक पोलिसांवर पूर्ण शहराचा भार पडला आहे. वाहतूक पोलिसांची संख्या वाढल्यास वाहतूक कोंडीची समस्या सुटेल. वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी अशी मागणी नागरिक करीत आहे.

वाहनांवर झालेले कारवाई

दुचाकी १५ हजार ३८३

कार २ हजार १७५

रिक्षा १ हजार ७२३

ट्रक ४ हजार १४६

इतर वाहने २ हजार ०९७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT