नाशिक

अमृत दोन योजनेतून क्रेडीट मर्यादा

CD
प्लायर ------------------- पाणीपुरवठा- मलनिस्सारण प्रकल्पांना ६२.९२ कोटींचे बळ अमृत दोन योजनेतून क्रेडीट मर्यादा; मंजुरीमुळे रखडलेल्या कामांना गती सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : शहराच्या पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या महापालिकेच्या तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना केंद्र सरकार पुरस्कृत अटल कायाकल्प व शहरी परिवर्तन अभियान अमृत- २.० योजनेतंर्गत राज्याच्या नगरविकास विभागाने एकूण ६२ कोटी ९२ लाख रुपयांची क्रेडिट मर्यादा मंजूर केली आहे. या मंजुरीमुळे रखडलेल्या कामांना गती येणार असून, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे सोपे होणार आहे. अमृत २.० अभियानांतर्गत राज्यातील विविध महापालिका व नगरपालिकांच्या प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली असून, बहुतेक कामे प्रगतिपथावर आहेत. केंद्र शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक मंजूर प्रकल्पासाठी केंद्राचा हिस्सा, राज्य शासनाचा हिस्सा आणि संबंधित महापालिकेने भरलेला स्वहिस्सा यांची एकत्रित बेरीज करून क्रेडिट लिमिट निश्चित केली जाते. नगरविकास विभागाच्या नुकत्याच जारी झालेल्या आदेशानुसार नाशिकसाठी ही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. निधीच्या विनियोगासाठी आता पारंपरिक पद्धतीऐवजी केंद्र शासन पुरस्कृत एसएनए स्पर्श (स्नॅप स्पर्श) प्रणालीचा वापर होणार आहे. पोर्टलवर संबंधित अंमलबजावणी यंत्रणेला ही क्रेडिट लिमिट मंजूर करून दिली जाणार आहे. महापालिकांनी यापूर्वीच आपला स्वहिस्सा राज्याच्या एकत्रित निधीमध्ये जमा केला आहे. आता त्याच निधीचा वापर त्याच प्रकल्पासाठी करण्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेची असेल. मंजूर क्रेडिट मर्यादेच्या आतच खर्चाचे नियोजन करावे, कोणत्याही परिस्थितीत मर्यादेपेक्षा जास्त निधी वापरू नये. तसेच निधी खर्च झाल्यानंतर त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित शहराकडून तात्काळ उपलब्ध करून घेणे बंधनकारक राहणार आहे. एकूण ६२.९२ कोटी रुपयांची क्रेडिट लिमिट महापालिकेसाठी मंजूर झाली आहे. ---------------------- प्रकल्पनिहाय तरतूद - १. पाणीपुरवठा सुधारणा प्रकल्प - ४४.७६ कोटी रुपये २. मलनिस्सारण प्रकल्प क्रमांक- १ - १४.०० कोटी रुपये ३. मलनिस्सारण प्रकल्प क्रमांक- २ - ४.१६ कोटी रुपये -----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather: पुण्यात परतीच्या पावसाची पाठ; ऑक्टोबरमध्ये अवघा १.७ मिमी पाऊस, ११ वर्षांतील नीचांकी नोंद

ICC ODI Rankings: अफगाणिस्तानने घडवला इतिहास! फक्त श्रीलंका, विंडीजलाच नाही, तर इंग्लंडलाही टाकलं मागे

Latest Marathi News Live Update : 'संविधानाला धक्का लागू देणार नाही!' फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

Dates & Coconut Ladoo: यंदाच्या दिवाळीत फराळात बनवा हटके पदार्थ! साखरेशिवाय तयार करा खजूर-नारळाचे पौष्टिक लाडू; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल!

Sharad Pawar Health Update: शरद पवार पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली हेल्थ अपडेट

SCROLL FOR NEXT