Wedding  esakal
नाशिक

Nashik Wedding Ceremony: पाळायचे नसतील तर मुहूर्त काढताच कशाला? विवाहासाठी ताटकळणाऱ्या पाहुणे-वऱ्हाडींचा प्रश्न

Nashik News : कडाक्याच्या उन्हात घामाघूम पाहुणे मंडळींना ताटकळत ठेवून उशिरा टाळी अर्थातच लग्न लावणे हे फॅशनच झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : कडाक्याच्या उन्हात घामाघूम पाहुणे मंडळींना ताटकळत ठेवून उशिरा टाळी अर्थातच लग्न लावणे हे फॅशनच झाली आहे. या प्रथेविषयी सार्वत्रिक नाराजी व्यक्त होत असून १२.३५ चे लग्न पावणे दोनला लागते, मग लग्न मुहूर्त काढतात कशाला ? असा सवाल उपस्थित केले जात आहे. (Nashik Wedding Ceremony not on time news)

नाशिक जिल्ह्यात यंदा उन्हाची तीव्रता जास्त आहे. पारा ३५ ते ३९ अंशांच्या दरम्यान असतो. मुहूर्त टळून जातो, लग्न उशिरा लागते, मग वरपिता आणि वरमाय या दोघा उभयतांच्या भेटी घेउन पाहुणे उपस्थित असल्याची हजेरी नोंदवतात. आज मुहूर्त जास्त असल्याने पुढच्या लग्नासाठी गुपचूप काढता पाय घेतात, असेही प्रकर्षाने जाणवते.

उन्हाच्या कडाक्याने अंगाची लाहीलाही होत असतानाही नातेवाईक, आप्तस्वकीय मंडळी, सगेसोयरे वऱ्हाडी विवाहाला हजेरी लावतात. पण वर पिता-वधू पिता व नवरदेवाचे कलवरे यांना त्याचे काहीच सोयरसुतक नसते. येणाऱ्या पाहुण्यांची काळजी नसेल तर अशा लग्नात उगाचाच पाहुण्यांना उन्हात थांबवून ठेवण्यात येते. विवाहाच्या आनंदात सामील होऊन वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी येणाऱ्यांच्या अडचणीची मात्र अनेकदा कुणालाच फिकीर नसल्याचे पाहायला मिळते. अलीकडे पदोपदी हे पाहायला मिळते. (Latest Marathi News)

मुहूर्त कशाला ?

तब्बल दीड ते दोन तास उशिराने लग्न लागतात. पाच- दहा मिनीटांचा उशीर वऱ्हाडी समजून घेतात. मात्र तब्बल दीड-दोन तास उशीर होत असल्यास पाहूण्यांना मनस्ताप सोसावा लागतो. त्यातून वैतागून मुहूर्ताचे वेळा कशाला असाही सवाल उपस्थित होतात. मुहूर्त पाळायचा नसेल तर हा देखावा म्हणावा लागेल, असेही एका नागरिकाने म्हटले आहे. उन्हातान्हात लग्नाला आलेल्या आप्त स्वकीयांचा विचार करुन लग्न वेळेत लागतील अशी अपेक्षा वऱ्हाडी मंडळी करीत आहेत.

"आग्रहाचे निमंत्रण असल्याने लग्नाला न जाणे हे माणुसकीला धरुन नसल्याने विवाहांना जावेच लागते. तो माणुसकी धर्माचा भाग आहे. तसाच, आमंत्रित पाहुणे रिकामटेकडे किंवा बिनकामाचे नसतात याचे भान ठेवणे माणुसकीला धरूनच आहे. हे संबंधितांनी ध्यानात घ्यायला हवे."

- नामदेव कोतवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT