Group Education Officer Sanjay Kusalkar and others while distributing books to schools centrally from Panchayat Samiti office. esakal
नाशिक

Nashik News : पहिल्याच दिवशी 28 हजार पाठ्यपुस्तके! येवल्यात 287 शाळांत 1 लाख 14 हजार 119 पुस्तकांचे वाटप

Nashik News : ‘स्कूल चले हम...’ म्हणत आज दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर सर्वच विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थिती लावली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ‘स्कूल चले हम...’ म्हणत आज दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर सर्वच विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थिती लावली. यावेळी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे गुलाब पुष्प देतानाच पाठ्यपुस्तकांचे वितरण करूनही विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. (yeola 28 thousand textbooks on first day distribution)

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २८७ शाळांसह इतर माध्यमिक शाळातही जल्लोषात प्रवेशोत्सव केल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर यांनी दिली. नवीन वर्षाच्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात झाली असून, शिक्षण विभाग यावर्षीही सज्ज झाला आहे. पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव साजरा केला. पहिली ते बारावीमधील सर्व विद्यार्थ्यांचे पुष्प, शालेय उपयोगी साहित्य देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

प्रवेशाच्या पहिल्या दिवशी गटविकास अधिकारी मच्छिन्द्र धस, गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील मारवाडी, साधन व्यक्ती राम कुलकर्णी यांच्यासह पंचायत समितीचे सर्व विभागप्रमुख, केंद्रप्रमुख व कर्मचाऱ्यांनी प्रत्येक शाळेच्या ठिकाणी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

दरम्यान, समग्र शिक्षा अभियानांतर्गत मराठी माध्यमाचे १२ हजार ९२३ विद्यार्थी, उर्दू माध्यमाचे १ हजार ९२३ विद्यार्थी, तर निम्न इंग्रजी माध्यमाचे १३ हजार ६३३ विद्यार्थी आहेत. या एकूण २८ हजार ५४९ विद्यार्थ्यांना मराठी व निम्न माध्यम १ लाख ६ हजार ५०६ पुस्तके, तर उर्दू माध्यमाची ७ हजार ६९२ पुस्तके अशी १ लाख १४ हजार ११९ पुस्तके वाटप करण्यात आली. (latest marathi news)

२८ हजारांवर विद्यार्थ्यांना पुस्तके

मोफत पाठ्यपुस्तक वाटप निकषपात्र शाळांची तालुक्यात लाभार्थी संख्या २८७ असून, यात शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था (जि.प.), अंशतः व पूर्ण अनुदानित शाळा तसेच समाज कल्याण आणि आदिवासी विभाग अनुदानित आश्रमशाळा यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेसह शासकीय व अनुदानित शाळातील पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचा लाभ दिला जातो.

तालुक्यातील २७४ मराठी व १३ उर्दू माध्यमाच्या अशा २८७ शाळातील विद्यार्थ्यांना उद्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके वाटप केली आहेत. पहिली ते आठवीतील २८ हजार ५४९ विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे एक याप्रमाणे तब्बल १ लाख १४ हजार ११९ पुस्तकांचे वाटप होणार असून, त्याची तयारी पूर्ण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT