Mother and family breaking tahoe after seeing blind boy washed away in Godavari river bed. esakal
नाशिक

Nashik Godavari Flood: गोदावरीच्या पुरात तरुण अभियंता गेला वाहून! अग्निशमन पथकाकडून शोधाशोध; चिमुरडी थोडक्यात बचावली

Nashik News : कुटूंबियांच्या डोळ्यादेखत ही घटना घडली. जीवरक्षकांसह अग्निशमन दलाच्या पथकाने पुराच्या पाण्यात तरुणाचा शोध सुरू केला मात्र, सायंकाळपर्यंत तो हाती लागला नव्हता.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Godavari Flood : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गोदावरी नदीला पुर आला आहे. यामुळे रामतीर्थांवर होणारे धार्मिकविधी नीलकंठेश्वर मंदिराजवळ होत असताना त्याठिकाणी धार्मिक विधी केल्यानंतर पुराचे पाणी पाहताना तोल जाऊन पुराच्या पाण्यात पडताच, तरुण अभियंता दिसेनासा झाला आहे. कुटूंबियांच्या डोळ्यादेखत ही घटना घडली. जीवरक्षकांसह अग्निशमन दलाच्या पथकाने पुराच्या पाण्यात तरुणाचा शोध सुरू केला मात्र, सायंकाळपर्यंत तो हाती लागला नव्हता. (young engineer swept away in Godavari flood)

यग्नेश पवार (२९, रा. ओझर, ता. निफाड) असे गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुण अभियंत्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर अभियंता हा महानिर्मिती या विभागाचा होता. त्यास वडिलांच्या जागेवर नोकरी मिळाली होती व भुसावळला पोस्टेड होता तसेच तो मूळचा ओझर येथील आहे.

दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून नाशिक आणि धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे गंगापूर धरणसाठ्यात वाढ झाली असून, धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. परिणामी, गोदावरी नदीला तब्बल दोन वर्षांनी पुर आला आहे. यामुळे गोदाघाटावरील रामतीर्थ येथे होणारे धार्मिक विधी हे काठावरील मंदिरांमध्ये सुरू होते.

पवार कुटूंबियदेखील कालसर्प योगाची पूजाविधी व देवदर्शनासाठी आले होते. दुपारी गोदावरीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत होती. नीलकंठेश्वर मंदिराजवळ पवार कुटूंबियांची पूजाविधी आटोपल्यानंतर यग्नेश पवार हे पुराच्या पाण्याजवळ डोकावून पाहत असतानाच त्याचा तोल गेला आणि तो पुराच्या नदीपात्रात कोसळला.

तो कोसळताच काही क्षणात दिसेनासाही झाला. ही घटना पवार कुटूंबियांच्या डोळ्यादेखत घडल्याने कुटूंबियांनी एकच टाहो फोडला. जीवरक्षकांनी पुराच्या पाण्यात उड्या घेतला परंतु यग्नेश त्यांच्या हाती लागला नाही. घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळपर्यंत शोधकार्य सुरू होते. दरम्यान, यावेळी पुराचे पाणी पाहण्यासाठीही नागरिकांनी गर्दी केली होती. (latest marathi news)

मुलगी थोडक्यात बचावली

दुपारी दीड वाजेच्या सुमारास तीन वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबीयांसह रामकुंड परिसरातील पायऱ्यांजवळ उभी होती. त्यावेळी तिचाही तोल गेल्याने ती नदीपात्रात बुडाली. मुलीला वाचविण्यासाठी तिच्या आईने नदीपात्रात उडी घेतली.

त्यापाठोपाठ बचाव पथकासह त्यांच्या नातलगांनी पुढाकार घेत तातडीने दोघींना पात्राबाहेर काढले. त्यामुळे मुलगी थोडक्यात बचावली. नदीपात्राबाहेर आलेल्या मुलीला अश्रू अनावर झाले. या घटनेनंतर पोलिसांनी पर्यटकांसह भाविकांना समज देत वेळेप्रसंगी ओरडा दिल्याचेही दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

मोठी बातमी : भारत-बांगलादेश मालिका स्थगित; रोहित शर्मा, विराट कोहली यांना ऑक्टोबरपर्यंत मिळाली सुट्टी

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

SCROLL FOR NEXT