Nashik ZP esakal
नाशिक

Nashik ZP News : जिल्हा परिषद अंदाजपत्रक उद्या होणार सादर

Nashik ZP : जिल्हा परिषदेचे २०२४-२५ या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रक गुरुवारी (ता. २२) सादर केले जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषदेचे २०२४-२५ या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रक गुरुवारी (ता. २२) सादर केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेऊन तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रजेवर जाणार असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडून सादर होणाऱ्या अंदाजपत्रकासाठी, मंगळवारी (ता. २०) दिवसभर लेखा व वित्त विभागात बैठकांची लगबग सुरू होती. (Nashik Zilla Parishad budget marathi news)

गतवर्षीच्या तुलनेत अंदाजपत्रकात फारशी वाढ नसल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे निधी खर्चासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धांना शुक्रवार (ता.२३) पासून सुरवात होत आहे.

यातच, मुख्य कार्यकारी अधिकारी रजेवर जाणार असल्याने गुरुवारीच अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. त्यानुसार लेखा व वित्त विभागाने अंदाजपत्रक सादर करण्याची तयारी गत आठवड्यापासून सुरू केली आहे. अंदाजपत्राकासाठी लेखा व वित्त विभागाने सर्व विभागांना निधी मागणीबाबतचे पत्र देत माहिती मागविली.

विभागांनी निधी मागणी नोंदविलेली आहे. अंदाजपत्रक तयार करण्यासाठी लेखा व वित्त विभागाने विभागनिहाय मॅरेथॉन बैठका गत आठवड्यात घेतल्या. त्यासाठी प्रत्येक विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून लेखा व वित्त अधिकारी भालचंद्र चव्हाण, उपलेखा वित्त अधिकारी प्रदीप चौधरी यांनी वन टू वन चर्चा केली.

अंदाजपत्रक सादर करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने मंगळवारी दिवसभर लेखा व वित्त विभागात बैठकांचे सत्र सुरू होते. यात विभागांकडून आलेली मागणी अन उपलब्ध निधी यांचा ताळमेळ बसविण्याची कसरत विभागाकडून सुरू होती. काही विभागांनी निधी मागणीबाबत उदासीनता दाखविली असल्याने अडचण झाली आहे.

तर, काही विभागांनी अतिरिक्त मागणी केल्याचे समजते. लेखा वित्त अधिकारी चव्हाण यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची मंगळवारी (ता.२०) भेट घेत अंदाजपत्रकांबाबत चर्चा केली. गतवर्षीचे प्रशासनाने ४५ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. यात वाढ होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. ( latest marathi news )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: समुद्र, शॉपिंग आणि मनोरंजनाचा संगम... मुंबईला मिळाले नवे पर्यटनस्थळ; इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल आता सर्वसामान्यांसाठी खुले

IND vs IRE 2nd T20I : वैभव सूर्यवंशी IN... पण, ना संजू OUT, ना अभिषेक..! भारताच्या Playing XI मध्ये दोन खेळाडूंचे पदार्पण होणार

१०० पुरुष, १५ महिलांशी शारीरिक संबंध, रात्रीच्या वेळी दारु पाजायचा अन्...; HIV पॉझिटीव्ह डिलीवरी बॉय निघाला सायको किलर

Mobile Restart : मोबाईल कधी रिस्टार्ट करावा अन् कधी नाही? आत्ताच घ्या जाणून नाहीतर फोन होऊ शकतो खराब

Latest Marathi News Update : पंढरपुरात पावसाची दमदार हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT