Nashik ZP  esakal
नाशिक

Nashik ZP News : नाशिक जिल्हा परिषद निधी खर्चात अव्वल!

Nashik News : जिल्हा परिषदेला सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या निधी खर्चात नाशिक जिल्हा परिषद नाशिक विभागात अव्वल ठरली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषदेला सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या निधी खर्चात नाशिक जिल्हा परिषद नाशिक विभागात अव्वल ठरली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या ५४३ कोटींच्या निधीपैकी ९४.६२ टक्के निधी खर्च झाला. यामुळे जिल्हा परिषदेने गेल्या वर्षी केलेल्या खर्चापेक्षाही अधिक खर्च केला आहे. (Nashik Zilla Parishad top in fund expenditure)

जिल्हा परिषदेला २०२२-२३ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून ५१० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्यानंतर पुनर्विनियोजनातूनही जवळपास ४० कोटी रुपये निधी प्राप्त झाला होता. या निधी खर्चास दोन वर्षांची मुदत असल्याने ३१ मार्च २०२४ पर्यंत अखर्चित राहिलेला निधी जिल्हा नियोजन समितीकडे परत करावा लागणार होता.

मात्र, ग्रामविकास विभागाने १२ एप्रिलपर्यंत या निधीतील देयके ऑफलाइन पद्धतीने मंजूर करण्यास परवानगी दिली. या काळात जिल्हा परिषदेने ३६ कोटींची देयके मंजूर केली आहेत. जिल्हा परिषदेचा अखर्चित निधी ६५ कोटी रुपयांवरून २९ कोटी रुपयांपर्यंत खाली आला आहे.

तसेच, ३१ मार्चला असलेली निधी खर्चाची टक्केवारी ९४.६२ टक्यांवर पोहोचली. विभागनिहाय विचार करता ग्रामीण पाणीपुरवठा व बांधकाम विभाग क्रमांक एक वगळता इतर सर्वच विभागांनी २०२२-२३ या वर्षात प्राप्त झालेला निधी खर्च करण्यात आघाडी घेतलेली आहे. (latest marathi news)

खर्च निधी असा

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग : ७९.५७ टक्के

बांधकाम विभाग क्रमांक एक : ८८.४८

कृषी विभाग : ८९

पशुसंवर्धन विभाग : ९८

उर्वरित विभाग ९१ ते ९८ टक्के

विभागात नाशिक पहिल्या स्थानावर

नाशिक विभागात नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार व जळगाव या पाच जिल्हा परिषदा येतात. या पाच जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेतील खर्चाची टक्केवारी पाहता यात नाशिक जिल्हा परिषद ९४.६२ टक्के निधी खर्च करीत पहिल्या स्थानी आहे. धुळे जिल्हा परिषद ९४ टक्के खर्च करून विभागात दुसऱ्या स्थानी, तर अहमदनगर व जळगाव या जिल्हा परिषदांनी अनुक्रमे ९१.११ व ९० टक्के खर्च केला. नंदुरबार जिल्हा परिषदेने २०२२-२३ या वर्षी प्राप्त झालेल्या निधीपैकी केवळ ६८ टक्के खर्च केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT