Nashik ZP News esakal
नाशिक

Nashik ZP News : जि. प. कर्मचारी बँकेची रविवारी वार्षिक सभा

Nashik News : नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेची १०४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. ७) सकाळी अकराला परशुराम साईखेडकर नाट्यगृहात होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेची १०४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. ७) सकाळी अकराला परशुराम साईखेडकर नाट्यगृहात होणार आहे. बँकेला सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात सर्व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा २.१५ कोटींचा झाला असून, संचालक मंडळाने यंदा सहा टक्के दराने लाभांश देण्याबाबत वार्षिक सर्वसाधारण सभेवर शिफारस केली आहे. (ZP Employees Bank annual meeting on Sunday)

बँकेची आर्थिक स्थिती अतिशय चांगली असून, बँकेचे भागभांडवल २२ कोटी २४ लाख, राखीव व इतर निधी २७ कोटी सहा लाख, एकूण ठेवी ३४८ कोटी ५५ लाख, कर्जवाटप २५२ कोटी ६४ लाख, एकूण गुंतवणूक २३ कोटी ९६ लाख इतकी केली असून, बँकेला ऑडिट वर्ग अ प्राप्त झालेला आहे. बँकेचा ‘सीआरएआर’ १४ टक्के इतका असून, ढोबळ नफा ३.५४ टक्के.

तर निव्वळ नफा १.७७ टक्के इतका असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे-पाटील यांनी दिली. उपस्थितीचे आवाहन बँकेचे उपाध्यक्ष महेश मुळे, संचालक सर्वश्री प्रमोद निरगुडे, नीलेश देशमुख, अजित आव्हाड.

मंदाकिनी पवार, सुनील गिते, धनश्री कापडणीस, रवींद्र आंधळे, रवींद्र बाविस्कर, मोहन गांगुर्डे, ज्ञानेश्वर माळोदे, जयंत शिंदे, विजय देवरे, रमेश बोडके, अभिजित घोडेराव, सचिन विंचूरकर, विक्रम पिंगळे, अमोल बागूल, विनोद जवागे व भरत राठोड यांनी केले आहे. (latest marathi news)

"सभासद कन्येच्या सन्मानार्थ या वेळी सभासदांच्या ज्या कन्येचा विवाह असेल, त्यांना विवाह भेट म्हणून ११ हजार रुपये इतकी रक्कम बँकेत ठेवून ठेव पावती भेट देण्याचा मानस आहे. ही एक आगळीवेगळी योजना राबविण्याचा बँकेच्या संचालक मंडळाचा विचार आहे. यासाठी यंदाच्या नफ्यातून ११ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. सभासद कन्येच्या विवाहाच्या दिवशी ही रक्कम ठेव पावती स्वरूपात कन्येला भेट देण्यात येईल. भविष्यात ही रक्कम वाढवायची, कमी करावयाची किंवा कसे, याबाबत त्या-त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल, असा संचालक मंडळाचा मानस आहे." - बाळासाहेब ठाकरे-पाटील, अध्यक्ष, जि. प. कर्मचारी बॅंक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Electricity: येत्या दोन वर्षांत गुजरातपेक्षाही स्वस्त वीज: मुख्यमंत्री फडणवीस, २०२९-३० पर्यंत महाराष्ट्र अव्वल ठरणार

FIFA World Cup: पुढचा प्रश्न घ्या... रोनाल्डोची मेस्सी, एम्बापेशी तुलना करणाऱ्या प्रश्नावर चिडचिड

Ketan Agrawal Murder Case : सिया लग्न मोडून प्रियकरासोबत पळून का गेली नाही? चेतनने पोलीस तपासात सांगितले धक्कादायक सत्य

२ वर्षांच्या चिमुकल्याला २५ वेळा चावा, २० मिनिटं मारहाण, एकाने केल्या उलट्या; प्ले स्कूलमधील संतापजनक प्रकार

Latest Marathi News Live Update : येत्या दोन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता; 'आयएमडी’चा इशारा

SCROLL FOR NEXT