Officials and employees of the Zilla Parishad Staff Federation while protesting at the entrance of the Panchayat Samiti and giving a statement to the Group Development Officer Sonia Nakade. esakal
नाशिक

Nashik ZP News : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची तासभर निदर्शने; कर्मचारी महासंघाचे समर्थन

Nashik ZP : केंद्र शासनाने कामगार-कर्मचारी यांच्या धोरणाविरोधात अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने शुक्रवारी (ता. १६) एक दिवसाचा देशव्यापी संप घोषित केला

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : केंद्र शासनाने कामगार-कर्मचारी यांच्या धोरणाविरोधात अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने शुक्रवारी (ता. १६) एक दिवसाचा देशव्यापी संप घोषित केला. या देशव्यापी संपास समर्थन म्हणून महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद (ZP)कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी सर्व पंचायत समिती व क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयासमोर सकाळी १० ते ११ या दरम्यान एक तास निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधले. (Nashik ZP protests by Zilla Parishad employees)

त्यांनतर महासंघाचे वतीने प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागण्यांचे निवेदन दिले, अशी माहिती जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुण आहेर, कार्याध्यक्ष भगवान पाटील, राज्य उपाध्यक्ष कैलास वाकचौरे, विभागीय महिला संघटक ज्योती केदारे यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व राज्य सरकारी व जिल्हा परिषद कार्यालयासमोर सर्व संवर्ग जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन सकाळी दहाला मस्टरवर स्वाक्षरी करून सकाळी अकरापर्यंत एक तास कामबंद करून तीव्र निदर्शने केली.

या वेळी कार्यालयासमोर जुनी पेन्शन योजना लागू करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा. रिक्त पदे तत्काळ भरा, राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या सर्व संवर्गाचे प्रश्न तत्काळ मार्गी लावा व इतर मागण्यांबाबत जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले. या वेळी श्रीधर सानप, जगन्नाथ सोनवणे, सचिन पवार, विलास काळे, संगीता पांडव, अश्विनी थैल, रोहित मोरे, स्मिता बोडके, छाया सोनवणे, सोनवणे अप्पा, शारदा पिठे, राजेंद्र हरिश्चंद्र आदी सर्व संवर्ग कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT