Nashik ZP News esakal
नाशिक

Nashik ZP Super 50 : ‘सुपर 50’च्या पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

Nashik ZP : जिल्हा परिषदेतर्फे २०२२ पासून ‘सुपर ५०’ उपक्रम राबविण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP Super 50 : जिल्हा परिषदेतर्फे २०२२ पासून ‘सुपर ५०’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, दिव्यांग, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट या परीक्षांकरिता निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण दिले जाते. या उपक्रमांतर्गत २०२४ या वर्षात सुपर ५० उपक्रमात सहभागी होण्यासाठी २१ जुलैला निवड परीक्षा झाली. ( result of Super 50 qualifying exam is declared )

या परीक्षेसाठी सात हजार ६५४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी पाच हजार ७६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल प्राप्त झाला असून, नाशिक जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी दिली. निकालानंतर प्रवर्गनिहाय पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार केली जाणार असून, अंतिम निवडयादी लवकरच जाहीर केली जाणार आहे. (latest marathi news)

सुपर ५० उपक्रमांतर्गत २०२२ मध्ये प्रवेश मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला असून, यातील २२ विद्यार्थ्यांनी JEE Mains परीक्षेत यश संपादन केले आहे. या २२ विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थी JEE Advance परीक्षा उत्तीर्ण झाले असून, या विद्यार्थ्यांचे आयआयटीमध्ये जाण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. निकाल बघण्यासाठी या https://zpnashik.maharashtra.gov.in/ लिंकचा उपयोग करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : पुण्यात भाजपची ३२ जागांवर आघाडी...तर राष्ट्रवादी आघाडी 14

BMC Election Result : मुंबई कुणाची? मतमोजणीला सुरुवात, पहिले कल आले समोर

Kolhapur Municipal Election Results : कोल्हापुरात मतमोजणीला सुरूवात, सजेत पाटील, धनंजय महाडिक, राजेश क्षीरसागरांची प्रतिष्ठा पणाला

Gold Rate Today : राज्यात महापालिका निकालाच्या दिवशी सोनं झालं स्वस्त! चांदीही घसरली; खरेदी करण्याआधी पाहा आजचे भाव

छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी महापौरांसह शिंदेंच्या कार्यकर्त्यांना पोलिसांचा चोप, मतमोजणी केंद्रावर राडा

SCROLL FOR NEXT