National Dengue Day esakal
नाशिक

National Dengue Day : राष्ट्रीय डेंगी दिनानिमित्त 16 मेस विशेष जनजागृती मोहीम होणार : वैशाली पाटील

सकाळ वृत्तसेवा

National Dengue Day : जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे १६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंगी दिवसानिमित्त जिल्हाभरात विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येईल. जनतेचा सक्रिय सहभाग घेतला जाईल. यंदा डेंगी दिनासाठी ‘डेंगीला पराभूत करण्यासाठी भागीदारीचा उपयोग करा’ अशी संकल्पना आहे.

मोहिमेत खासगी वैद्यकीय व्यावसायिक, नागरिक यांनी सहभागी होऊन डेंगी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवावी, असे जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटील यांनी सांगितले. (National Dengue Day special awareness campaign will held on 16 May on occasion of National Dengue Day Vaishali Patil nashik news)

आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळल्यास डेंगी व चिकुनगुन्या आजारांना दूर ठेवू शकतो. त्यासाठी पाण्याची भांडी स्वच्छ करून कोरडे करून त्यात पाणी भरणे योग्य आहे. तसेच पाणी साठवून ठेवताना नेहमी पाणी साठवण्याची भांडी झाकून ठेवावीत.

एडिस डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी परिसर स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. बऱ्याचदा घरामध्ये, शहरात, गॅरेजमध्ये, कार्यालयात रोज न लागणाऱ्या वस्तू बाहेर उघड्यावर कचऱ्यात फेकल्या जातात अथवा छतावर ठेवल्या जातात.

त्यामुळे पावसाळ्यात त्यात पावसाचे पाणी साचते व आठवड्यानंतर डासांच्या अळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे निरुपयोगी सामानाची वेळीच विल्हेवाट लावणे अथवा ते झाकून ठेवणे आवश्यक आहे. तसेच घराच्या छतावर पावसाचे पाणी साचून राहणार नाही याचीही दक्षता घ्यावी, असेही श्रीमती पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तापाची लक्षणे दिसतात

एडिस इजिप्टी डास चावल्यानंतर तापाची लक्षणे दिसायला लागतात. ताप, अंगदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी, उलटी-मळमळ व अंगावर पुरळ अशी लक्षणे दिसताच, तत्काळ रक्ताची तपासणी करून घ्यावी. जिल्हा सामान्य रूग्णालयात मोफत तपासणी करण्यात येते.

डेंगीचे निदान झाल्यास वेळेत औषधोपचार करावा, जेणेकरून डेंगीमुळे मृत्यू होण्याचे टाळता येवू शकते. दरम्यान, एडिस डासांची उत्पत्ती साठलेल्या स्वच्छ पाण्यात होते. एडिस डासाला टायगर मॉस्किटो असेही म्हणतात. कारण या डासाच्या अंगावर काळे-पांढरे चट्टे असतात. हा डास दिवसा चावतो.

डासाची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात. मात्र वर्षभरानंतर पाणी उपलब्ध होताच त्यातून पुन्हा डासाची अळी तयार होते. त्यामुळे डासांच्या अळ्या असलेली भांडी घासून पुसून स्वच्छ केली पाहिजेत. जेणेकरून भांड्याच्या कडेला चिकटलेली अंडी निघून जातील.

घ्यावयाची खबरदारी

० डासांपासून वैयक्तिक संरक्षणासाठी मच्छर दाणीचा वापर करणे

० डास प्रतिबंधात्मक मलम वापरणे

० खिडक्यांना बारीक जाळी बसवणे

० अंग झाकून राहील असे कपडे वापरणे

० गप्पी मासे हे डासांच्या अळ्या खातात. त्यामुळे पाण्याचे मोठे हौद, विहीरी, डबके आदी ठिकाणी गप्पी मासे टाकावेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: 'जरांगे-पाटील यांच्याशी आमचा कवडीचा संबंध नाही'; शरद पवारांनी नाशिकमध्ये दिले स्पष्टीकरण

IND vs PAK : सूर्यकुमार यादव भाजपा प्रवक्ता... Asia Cup मध्ये लाज निघाल्यावर टीम इंडियाच्या कॅप्टनवर पाकिस्तानकडून नको ते आरोप; कोण म्हणतंय असं?

अरे हे चाललंय तरी काय! पुन्हा बदलली झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेची वेळ? नेटकऱ्यांनीच दाखवला फोटो

Sharad Pawar : ‘महाराष्ट्राची सामाजिक वीण विस्कटली’, आरक्षणावरुन शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Hug My Younger Self स्टाईलचा फोटो बनवा एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT