From left Rohini Bhawar and Sushma Chaudhary.  esakal
नाशिक

National School Kho Kho Competition: ‘सुषमा’ ठरली देशातील सर्वोत्तम खेळाडू; रोहिणीची चमकदार कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

National School Kho Kho Competition : नुकताच पार पडलेल्‍या ६७ व्‍या १७ वर्षाआतील शालेय राष्ट्रीय खो-खो स्‍पर्धेत नाशिकची सुषमा चौधरी देशातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू ठरली. तर रोहिणी भवर हिनेही चमकदार कामगिरी केली. (National School Kho Kho Competition Sushma chaudhary became best player in country nashik news)

स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्र राज्याचे कर्णधारपद जिल्हा परिषद नाशिकच्या शासकीय माध्यमिक कन्या शाळेची खेळाडू सुषमा चौधरी हिच्याकडे होते. याच शाळेतील तिची दुसरी सहकारी खेळाडू रोहिणी भवरच्या अष्टपैलू खेळीने महाराष्ट्राने सुवर्णपदकाला गवसणी घातली.

महाराष्ट्राचे नेतृत्व भूषविणारी सुषमा चौधरी नाशिकची तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणारी पहिली खेळाडू आहे. या स्पर्धेतील सुषमाच्या अष्टपैलू कामगिरीमुळे देशातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून तिची निवड करण्यात आली आहे.

यापूर्वी १८ वर्षा आतील भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील सर्वोत्तम आक्रमक खेळाडू हा पुरस्कार नाशिकच्या वृषाली भोयेने पटकाविला होता. त्यानंतर देश पातळीवर पुरस्कार मिळविणारी सुषमा ही नाशिकची दुसरी खेळाडू आहे.

१७ वर्षाआतील गटात राज्याच्या संघात निवड होणाऱ्या सुषमा आणि रोहिणी या नाशिकच्या पहिल्या खेळाडू असून सुषमाची दुसरी तर रोहिणीची ही सलग दुसरी राष्ट्रीय स्पर्धा आहे. सुषमा आणि रोहिणी या नाशिक जिल्हा खोखो असोसिएशन संचलित स्व.सुरेखाताई भोसले निवासी खो-खो प्रबोधिनीच्या खेळाडू आहेत.

त्या गीतांजली सावळे आणि उमेश आटवणे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे सराव करतात. सुषमा आणि रोहिणी यांच्या सोनेरी यशाबद्दल नाशिक जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, आजीवन अध्यक्ष रमेश भाऊ भोसले, कार्याध्यक्ष आनंद गारमपल्ली, खजिनदार सुनील गायकवाड आदींनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT