New Nashik Police Commissioner Sandip Karnik esakal
नाशिक

SAKAL Impact: चांगल्या उपक्रमांची आयुक्तांकडून नव्याने अंमलबजावणी; गेल्या 10 वर्षांतील उपक्रमांची मागविली माहिती

- नरेश हाळणोर

नाशिक : नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात गेल्या दहा वर्षात पोलीस दलामध्ये कारकिर गाजविलेल्या अधिकाऱ्यांनी काम केलेले आहे. या अधिकाऱ्यांनी आपल्या कारकिर्दीत अभिनव सामाजिक उपक्रमांसह गुन्हेगारीविरोधात कडक धोरण राबविल्याने ते नाशिककरांच्या नेहमीच स्मरणात राहिले.

त्या उपक्रमांची, गुन्हेगारीविरोधातील धोरणांची माहिती नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संबंधित विभागांकडून घेतली आहे. तसेच, उपायुक्तांसह सहायक आयुक्तांची बैठक घेत यापूर्वी राबविलेले उपक्रम, धोरणांची अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून पहिले पाऊल टाकले आहे.

दरम्यान, शहरात गेल्या दहा वर्षात पोलीस आयुक्तांनी राबविलेल्या उपक्रम व धोरणांचा आढावा घेणारी बातमी ‘दै.सकाळ’मधून मंगळवारी (ता.२८) प्रसिदध झाली असता, या बातमीचीच दखल आयुक्त कर्णिक यांनी घेतली. (New implementation of good initiatives by Commissioner karnik Requested information on activities in last 10 years sakal impact Nashik News)

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गेल्या शुक्रवारी (ता.२४) नाशिक शहर पोलीस आयुक्तपदाचा पदभार घेतला. त्यानंतर दोन दिवस सार्वजनिक सुट्ट्या आल्या. तरीही त्यांनी भद्रकाली पोलीस ठाण्याला भेट देत कामकाजाची पाहणी केली.

तसेच शहरातील मागील गुन्ह्यांचा आढावाही या काळात घेतला. तर मंगळवारी (ता.२८) आयुक्त कर्णिक यांनी प्रत्यक्ष कामकाजाला सुरूवात केली. ‘दै.सकाळ’ मध्ये मंगळवारी (ता.२८) ‘आयुक्त कर्णिक यांचे 'वेट ॲण्ड वॉच’ या मथळ्याखालील बातमी प्रसिद्ध झाली.

या बातमीचा आयुक्त कर्णिक यांनी गांभीर्यांने दखल घेतली. या बातमीतून शहरात गेल्या दहा वर्षात आयुक्तपदाची जबाबदारी पार पाडलेल्या पोलीस आयुक्तांनी त्यांच्या कारकिर्दीत राबविलेल्या उपक्रमांचा आणि गुन्हेगारीविरोधातील कडक धोरणांचा आढावा घेण्यात आलेला होता.

परंतु नवीन अधिकारी रुजू झाल्यानंतर ते उपक्रम वा धोरण मागे पडून नवीन उपक्रम व धोरण राबविले जाते. अशास्थितीमध्ये चांगले उपक्रम वा धोरण मागे राहून जातात.

आयुक्त कर्णिक यांनी याच मुद्द्याला हात घालत आयुक्तालयातील संबंधित विभागांना गेल्या दहा वर्षांत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची व गुन्हेगारीविरोधातील कडक धोरणांची माहिती मागविली.

तसेच, त्यातील कोणत्या धोरणांचा सकारात्मक परिणाम दिसून आला याचीही माहिती आयुक्त कर्णिक यांनी मागविली.

त्याचप्रमाणे, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ दोनचे उपायुक्त मोनिका राऊत, वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्यासह सहायक आयुक्त सिद्‌धेश्वर धुमाळ, नितीन जाधव, शेखर देशमुख, आनंदा वाघ यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला.

कम्युनिटी पोलिसिंगवर भर

पोलीस आणि नागरिक यांच्यातील दुरावा कमी करण्यासाठी, तसेच नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास निर्माण व्हावा, संबंध दृढ व्हावे यासाठी पोलीस ठाणेस्तरावर कम्युनिटी पोलिसिंगवर भर दिला जाणार आहे.

त्यासाठी यापूर्वी राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांमध्ये नव्याने भर घालून त्यांची अंमलबजावणी करण्याचे संकेत आयुक्त कर्णिक यांनी दिले.

तसेच, वाहतूक समस्या सोडविण्यासह वाहनचालकांमध्ये दंडात्मक कारवाईपेक्षा प्रबोधनात्मकपणे जनजागृतीसाठीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

"नाशिक शहराला नावाजलेले पोलीस आयुक्त यापूर्वी लाभलेले आहेत. त्यांनी राबविलेल्या चांगल्या उपक्रमांची माहिती घेऊन त्यात नव्याने भर घालून त्यांची अंमलबजावणी केली जाईल. शहर शांत व सुरक्षित राहील या दृष्टिकोनातूनच पोलिसांचे कामकाज असेल."

- संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT