the iron bridge esakal
नाशिक

SAKAL Impact : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर 8 दिवसात नवीन लोखंडी पूल

आनंद बोरा

नाशिक : शेंद्रीपाडा (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील तास नदीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर आठ दिवसांमध्ये पुन्हा नव्याने लोखंडी पूल उभा राहिला.

त्यामुळे इथल्या आदिवासी कुटुंबीयांना आता रस्ता, पिण्याचे पाणी अन वीज मिळण्याची अपेक्षा आहे. ‘सकाळ'ने आदिवासी बांधवांच्या प्रश्‍नांचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. (New iron bridge on taas river in 8 days after CM order in shendripada Latest Marathi news)

तास नदीवरील बल्ल्यांवरुन आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज जीव धोक्यात घालून कसरत करावी लागत होती. ही समस्या ‘सकाळ'ने मांडल्यानंतर तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेतली आणि तीन दिवसांमध्ये नदीवर लोखंडी पुलाची उभारणी झाली होती.

मात्र, मधल्या पावसामधील वेगाने आणि पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात हा लोखंडी पूल वाहून गेला. त्यामुळे शेंद्रीपाड्यावरील आदिवासी भगिनींची पिण्याच्या पाण्यासाठी बल्ल्यांवरुन कसरत सुरु झाली. त्याचवेळी शाळकरी मुलांचे हाल सुरु झाले.

त्यासंबंधीचे वृत्त ‘सकाळ'ने प्रसिद्ध करताच, त्याची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी प्रत्यक्ष पाड्यावर येऊन इथल्या आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाने आदिवासी बांधवांसाठी नव्याने लोखंडी पूल उभारण्याचे निर्देश दिले होते.

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांनी इथे पाहणी करत पुलाचा आराखडा, अंदाजपत्रक तयार करून दिले. त्यानुसार नव्याने लोखंडी पूल तयार करण्यात आला आहे. हा पूल तास नदीवर उभारण्यात आला आहे.

त्यामुळे इथल्या आदिवासी कुटुंबियांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मुळातच, तास नदीच्या प्रवाहाचा विचार करता, इथे पक्का पूल उभारण्याची अपेक्षा आदिवासी कुटुंबांमध्ये आहे. याशिवाय आदिवासी बांधवांच्या सूचनेनुसार आणखी एक पूल उभारण्याचे अंदाजपत्रक बांधकाम विभागाने तयार केले आहे.

याखेरीज आदिवासी कुटुंबांच्या दारापर्यंत नळ पोचवण्याची योजना पाणीपुरवठा विभागाने तयार केली आहे. पावसामुळे शेंद्रीपाड्यावर जाण्यासाठी रस्ता ठीक नसल्याने लोखंडी पूल न्यायाचा कसा? असा प्रश्‍न यंत्रणेपुढे उभा ठाकला होता. मात्र पावसाने उघडीप दिल्याने नवीन पूल उभारला गेला आहे.

"पहिल्या पावसात नदीवरील पूल वाहून गेला होता. आमचा प्रवास पुन्हा बल्लीवरून सुरु झाला होता. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा पूल उभा करून दिल्याने आम्ही त्यांचे आभार मानतो. आता आमच्या वस्तीवर वीज, पिण्याचे पाणी पोचावे आणि रस्ता व्हावा अशी अपेक्षा आहे."

- अमृत राऊत, स्थानिक रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT