news about gram panchayat election in nashik marathi news
news about gram panchayat election in nashik marathi news 
नाशिक

ग्रामपंचायत रणधुमाळी : गावागावात वाहू लागले राजकीय वारे! कट्ट्यावर रंगतेय शाब्दीक चकमक 

दीपक अहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत आता खरी रंगत चढली आहे. निफाड तालुक्यातील ६३ गावांमध्ये राजकीय वारे जोरदार वाहू लागले आहे. उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. काय होईल याचा अंदाज बांधण्यासाठी आतापासूनच गावातील कट्टा-चावडीवर चर्चा रंगत असून, शाब्दीक चकमकी झडत आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीचा फिव्हर... 

सध्या द्राक्षबागा प्रतिकुल हवामानामुळे संकटात असताना त्याऐवजी ग्रामपंचायतीच्या रणसंग्रामाचा फिवर गावागावत चढला आहे. एकाच पक्ष व गटातील कार्यकर्ते परस्परांसमोर शड्डू ठोकून उभे आहेत. धुमधडाक्यात प्रचाराचा शुभांरभ झाल्याने गावागावात डावपेच रंगत आहे. किंगमेकर नेत्यांनी पॅनलची उभारणी केली असून, निवडणुकीचा ज्वर यंदा जार वेगळा दिसतो आहे. त्यामुळे आता उमेदवार पक्के झाल्याने कोण जिंकणार, कोणता उमेदवार एक पाऊल पुढे, कुणाला पडद्याआड कुणाची मदत याबाबत कयास लावला जात आहे. अशा अनेक चर्चांनी ग्रामीण भागात ऊत आला आहे. कुठे पारावर, चावडीवर, तर कुठे शेकोटी पेटवून नागरीक निवडणुकीचे आडाखे बांधण्यात दंग झाले आहेत. कोणता उमेदवार दुबळा व प्रबळ यावर चकमकीच्या फैरीही झडत आहे. 

विजयश्री खेचून आणण्यासाठी जीवाचे रान

ग्रामपंचायतींची निवडणूक ही सर्वात किचकट अन्‌ बिकट. कुठे गावगाड्यात विकासाचा अंजेडा तर कुठे भाऊबंदकी व जातीपातीचे राजकारण. विजयश्री मिळविण्यासाठी जीवाचे रान करीत नाती, भाऊबंदकी हे सर्व विसरून केवळ विजयश्री खेचून आणण्याची खुणगाठ बांधून मतदाराजाला आपल्या बाजूला वळविण्यात उमेदवार व्यस्त आहे. एकएक मतदार कसा आपल्याकडे वळवावा यामागे खल सुरू असून, प्रलोभन, शपथा दिल्या घेतल्या जात आहेत. जुने हेवेदावे, द्वेष, मैत्री, मदतीच्या आठवणी, स्थानिक राजकारण, जातीय समीकरण, पक्ष व गटाचे बलाबल, आमिषे दाखवित निवडणुकीचा गावगाड्यातील महायज्ञ सध्या पेटला आहे. गावपातळीवरील नेते आपले अस्तित्व दाखवून पक्षांच्या नेत्यांसमोर आपली उंची कशी वाढेल व अबाधित राहील, यासाठी परिश्रम घेत आहे. असुविधा, रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा आदी मुद्यावर धुमशान सुरू आहे. 

हायटेक प्रचार... 

सोशल मिडीया, मोबाईल आदींच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रचार हायटेक बनला आहे. व्हिडीओ क्लिपचा मारा मतदारांवर सुरू आहे. डिजीटल व सोशल मिडीयाचा प्रभावी वापर केला आहे. एरवी रोजगारासाठी शहराकडे धावणारा ग्रामीण तरूण आपण नेहमी बघतो. मात्र, शहरात डिजीटल मिडीया, सोशल मिडीयात काम करणारा तरूण वर्ग व्हिडीओ क्लिप, ध्वनीफीत, स्लोगन, प्रचाराशी मिळती-जुळती चित्रपटगीत, उमेदवाराचे चिन्ह यांचा लॅपटॉप व मोबाईल डाटा तयार करण्यासाठी ग्रामीण भागात अवतरला आहे. यासाठी मोठ्या पॅनलकडून मोठे पॅकेज दिले जात आहे. या बदलत्या प्रचारयंत्रणेद्वारे प्रत्येक उमेदवार हायटेक प्रचाराचा फंडा अवलंबत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Labour Day : कामगार दिन! प्रत्येकाला माहिती असायला हवे असे भारतातील 11 कायदे

Satara Lok Sabha : शरद पवारच माझे मुख्य प्रचारक; असं का म्हणाले खासदार उदयनराजे?

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT