Nima Power 2023
Nima Power 2023 esakal
नाशिक

Nima Power 2023 : निमा पॉवर प्रदर्शनाची तयारी पूर्णत्वाकडे

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक इंडस्ट्रीज ॲन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) तर्फे १९ ते २२ मे दरम्यान त्र्यंबक रोडवरील आयटीआय मैदानावर आयोजित निमा पॉवर २०२३ प्रदर्शनाची तयारी पूर्णत्वाकडे आहे. सर्व २२५ स्टॉल्स बुक झाले आहेत. (Nima Power exhibition on 19 may nashik news)

उद्‌घाटन शुक्रवारी (ता. १९) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच उद्योगमंत्री उदय सामंत व पालकमंत्री दादा भुसे, औद्योगिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आणि प्रदर्शनाचे चेअरमन मिलिंद राजपूत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

नाशिक डेस्टिनेशन व नाशिकला इलेक्ट्रिकल- इलेक्ट्रॉनिक क्लस्टर व्हावे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन आयोजित या प्रदर्शनामुळे नाशिक उद्यमनगरीचे नाव केवळ राज्यात आणि देशातच नव्हे तर सातासमुद्रापार नेण्याचा मानस आहे. सर्व वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि उद्योगासह विविध क्षेत्रातील दिग्गज प्रदर्शनात दररोज उपस्थित राहून उद्योजकांशी संवाद साधतील.

तसेच, या वेळी अनेक परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या होतील. प्रदर्शनामुळे औद्योगिक विकासाबरोबरच गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल तसेच नाशिकचे ब्रॅंडिंग होईल, असेही बेळे पुढे म्हणाले. कोविडकाळात सर्वाधिक फटका उद्योगक्षेत्राला बसला. आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या उद्योजक पार कोलमडला आहे. त्यातून तो सावरावे यासाठी सर्व स्तरावरून विविध उपाययोजना केल्या जात असून, या पॉवर प्रदर्शनामुळे उद्योजकांना नवसंजीवनी मिळणार मिळणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नावीन्यपूर्ण तसेच नवीन तंत्रज्ञानाचे स्टॉल्स हे या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य असेल. नवनवीन आव्हानांना सामोरे जाणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे हासुद्धा प्रदर्शनाचा मुख्य हेतू असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. एचएएलचे मिग विमान हेसुद्धा या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरणार आहे.

उद्योगधंद्यांसाठी पोषक वातावरण असून येथे इलेक्ट्रिकल- इलेक्ट्रॉनिकसह विविध नवीन उद्योग यावेत म्हणून त्यांच्यासाठी रेडकार्पेट टाकले जावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रदर्शनाला एक लाखांहून अधिक लोक भेट देतील,असा अंदाज असल्याचेही बेळे यांनी स्पष्ट केले.

प्रदर्शन यशस्वितेसाठी निमाचे सरचिटणीस राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष किशोर राठी, आशिष नहार, खजिनदार विरल ठक्कर, हर्षद ब्राह्मणकर, नितीन वागस्कर, शशांक मणेरीकर, प्रवीण वाबळे, किरण वाजे, दिलीप वाघ, कैलास पाटील, गोविंद झा, संदीप भदाणे, जयंत जोगळेकर, रवींद्र झोपे, राजेंद्र वडनेरे, विराज गडकरी, संजय राठी, हेमंत खोंड,

वैभव जोशी, संजय सोनवणे, श्रीधर व्यवहारे, जितेंद्र आहेर, मनीष रावळ, श्रीकांत पाटील, रवी शामदासानी, एस. के. नायर, सुधीर बडगुजर, सुरेंद्र मिश्रा, सतीश कोठारी, रावसाहेब रकिबे, प्रशांत जोशी, जयदीप राजपूत, मंगेश काठे, व्यंकटेश मूर्ती, परमानंद नेहे, विश्‍वास शिंपी, बाळासाहेब जाधव, किरण लोणे, विश्वजित निकम, वैभव चावक, विश्वास शिंपी, विजय कडवाने, योगिता आहेर आदी प्रयत्नशील आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT