NMC Nashik News esakal
नाशिक

NMC News: अतिक्रमण मोहिमेतील जप्त साहित्याचा लिलाव

सकाळ वृत्तसेवा

NMC News : महापालिकेकडून अतिक्रमण मोहीम राबविली जाते. या मोहिमेतून जप्त केलेले साहित्य दंडात्मक आकारणी करून परत केले जाते. परंतु बहुतांश साहित्य पडून राहत असल्याने त्या पडून राहिलेल्या साहित्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अतिक्रमित साहित्य सोडवून घेण्यासाठी अतिक्रमण विभागाकडून तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे. (NMC News Auction of seized materials from encroachment drive nashik)

महापालिकेकडून अतिक्रमण मोहीम राबविली जाते. या मोहिमेत अतिक्रमित धारकांचे साहित्य जप्त केले जाते. जप्त केलेले साहित्य आडगाव येथील ट्रक टर्मिनसच्या जागेतील गोडावूनमध्ये ठेवले जाते. अतिक्रमित साहित्य परत मिळविण्यासाठी दंडात्मक आकारणी केली जाते.

जवळपास पाच पट दंडात्मक आकारणी केली जाते. दंडात्मक आकारणीमध्ये अतिक्रमण मोहिमेचा खर्च वसुल केला जातो. त्यामुळे दंडात्मक आकारणी अधिक होते. जप्त केलेल्या मालापेक्षा दंडाची रक्कम अधिक असल्याने ते साहित्य परत घेण्यासाठी संबंधित व्यक्ती येत नाही.

महापालिकेचे अतिक्रमण साहित्याने पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे जप्त केलेल्या साहित्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साहित्य जप्त करण्यासाठी महापालिका कायद्यातील तरतुदीचा आधार घेतला जाणार आहे.

लिलावापूर्वी संबंधितांना अंतिम संधी देण्याचा भाग म्हणून जप्त साहित्य सोडवून नेण्यासाठी महापालिकेने अतिक्रमणधारकांना ३० दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीनंतर मात्र सदर साहित्याचा लिलाव केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT