NMC Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar while welcoming the Norwegian Consul General Arnijn Flollo in Mumbai, Norway.
NMC Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar while welcoming the Norwegian Consul General Arnijn Flollo in Mumbai, Norway.  esakal
नाशिक

Nashik News: NMCच्या प्रकल्पांना मिळणार नॉर्वे तंत्रज्ञान! राजदूत प्रतिनिधींच्या नाशिक भेटीत आश्वासन

विक्रांत मते

नाशिक : जर्मन व चीन येथील दोन शहरांशी सिस्टर सिटी म्हणून करार केल्यानंतर आता युरोपातील कमी लोकसंख्येचा परंतु तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या नॉर्वे देशाकडून वेस्ट मॅनेजमेंट, वीज निर्मितीसह हायड्रोजन इंधन तयार करण्यासाठीचे तंत्रज्ञान मिळणार आहे.

त्याचबरोबर नाशिक महापालिकेची इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगची गरज लक्षात घेऊन तेदेखील तंत्रज्ञान देण्याची तयारी नॉर्वेचे दूतावास कार्यालयाच्या प्रतिनिधींनी दर्शविली. (NMC projects will get Norway technology assured in Ambassadors delegations visit to Nashik Nashik News)

नॉर्वे देशाच्या मुंबई येथील नॉर्वेजियन कॉन्सल जनरल अर्नेजन फ्लोलो यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी मुंबई, पुणे व नवी मुंबई पाठोपाठ नाशिक महापालिकेला भेट देवून पायाभूत सुविधांची माहिती जाणून घेतली. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रतिनिधीचे स्वागत केले.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, भाग्यश्री बानाईत, नॉर्वेजियन स्पेशल मिशनचे प्रियद कुलकर्णी, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंढे, अधिक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. कल्पना कुटे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आवेश पलोड, कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, उपअभियंता रवींद्र बागूल उपस्थित होते. आयुक्त पुलकुंडवार यांनी पॉवर प्रेझेन्टेशनद्वारे शहरातील पायाभूत सुविधा, वातावरण, मलनिस्सारण केंद्रांची माहिती दिली.

काय आहे योजना?

नार्वे हा देश जवळपास पन्नास लोकसंख्येचा आहे. परंतु ज्या काळी भारतात आधुनिक तंत्रज्ञानाचा विचार रुजू लागला. त्याकाळात नार्वे या देशाने विद्युत निर्मिती, पर्यावरण, घनकचरा व्यवस्थापन, मलजल व्यवस्थापन, बांधकाम वेस्ट मॅनेजमेंट, नदी व समुद्र काठ संवर्धन, पाणी स्वयंपूर्णता, स्वच्छता, गाळाचा पुनर्वापर या विषयांवर काम करताना नवीन तंत्रज्ञान विकसित केले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

भारतात विशेष करून महाराष्ट्रात नागरीकरण वेगाने वाढत आहे. त्यातून वरील समस्या तीव्रतेने समोर येत असल्याने नार्वे तंत्रज्ञानाचा वापर व्हावा या उद्देशाने नॉर्वेच्या प्रतिनिधींकडून जी-२० परिषदेच्या अनुषंगाने महाराष्ट्र, गुजरात, गोवा या तीन राज्यातील महत्त्वाच्या शहरात दौरे काढून आढावा घेऊन तंत्रज्ञान पुरविण्याची तयारी दर्शविली जात आहे. नाशिक महापालिकेत त्याच अनुषंगाने आढावा घेण्यात आला.

चार्जिंग स्टेशनसाठी सहकार्य

महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीकडून २५ इलेक्ट्रिकल बस खरेदी केल्या जाणार आहे. बससाठी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. त्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविण्यात आली. त्याचबरोबर नदी संवर्धन, स्वच्छता, हायड्रोजन एनर्जी या विषयावरदेखील मदत करण्याची तयारी दर्शविण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT