nmc esakal
नाशिक

NMC Water Tax Recovery: CNPला नोटीस देताच सव्वा कोटींची थकबाकी अदा!

सकाळ वृत्तसेवा

NMC Water Tax Recovery : नाशिक रोड येथील करन्सी नोट प्रेस व इंडिया सेक्युरिटी प्रेस आस्थापनांकडे एक कोटी अकरा लाख रुपयांची पाणीपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी नोटीस पाठविताना नळजोडणी तोडण्याचा इशारा दिल्यानंतर तातडीने प्रेस व्यवस्थापनाने थकीत रक्कम महापालिकेकडे अदा केली. (NMC Water Tax Recovery notice given to CNP pay dues of half crore nashik)

घरपट्टी व पाणीपट्टी वसुली करण्यासाठी महापालिकेच्या विविध कर विभागाने कंबर कसली आहे. घरपट्टी वसुलीचा आकडा १४० कोटींवर पोचला आहे.

परंतु पाणीपट्टी मात्र अपेक्षित वसुली होत नाही. पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ७५ कोटी रुपये आहे. त्यापैकी जवळपास २७ कोटी रुपये वसूल झाले आहेत. त्यामुळे शंभर टक्के पाणीपट्टी वसुली करण्यासाठी विविध कर विभागाने थकबाकीदारांवर कारवाईची मोहीम सुरू केली.

थकबाकीदारांना २४ तासांची नोटीस देऊन नळजोडण्या बंद केल्या जात आहेत. करन्सी नोट प्रेस आस्थापनेकडे एक कोटी अकरा लाख रुपयांची थकबाकी होती.

नोटीस पाठविल्यानंतर तातडीने थकबाकी अदा करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेला पाणीपट्टीवसुलीत मोठा दिलासा मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मनसे नेते अविनाश जाधव यांची सुटका, आंदोलनात घेतला सहभाग

MNS Mira bhayandar Morcha: मराठी मोर्चाला पोलिसांचा अडथळा? गुजराती-मारवाडींची चिथावणी; मीरा-भाईंदरमध्ये काय घडलं?

निशिकांत दुबेंच्या विधानावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले मंत्री प्रताप सरनाईक?

Viral Video : पुढील कसोटीसाठी येण्याची तसदी घेऊ नकोस! Dinesh Karthik ने सर्वांसमोर रवी शास्त्रींची केली पोलखोल

अखेर अस्मिताला समजणार प्रियाचा खरा चेहरा; भावजयीवर चांगलीच भडकली , वाचा 'ठरलं तर मग' मध्ये पुढे काय होणार?

SCROLL FOR NEXT