Dugarwadi waterfall nashik esakal
नाशिक

Nashik News : दुगारवाडी, हरिहर गडावर जातायं? या वेळेनंतर गेलात तर ‘नो एन्ट्री’... गर्दी टाळण्यासाठी निर्णय

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काचुर्ली गावातील दुगारवाडी धबधबा बघण्यासाठी गेलेल्या देवळाली कॅम्पचा युवक वाघ नदीत वाहून गेल्याची घटना गेल्या रविवारी घडली.

युवकांचा हा सर्वाधिक पसंतीचा ‘स्पॉट’ असल्याने पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यातून अनुचित प्रकार घडतात आणि प्रसंगी पर्यटकांचा जीवही जातो.

पावसाळा सुरु होताच पर्यटन स्थळांवरील अपघात टाळण्यासाठी वन विभागाने दुगारवाडी, हरिहर गडावर दुपारी ३ वाजेनंतर प्रवेशबंदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच अंजनेरी येथेही मर्यादित पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. (no entry to Dugarwadi Harihar Fort after 3 pm nashik news)

गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी दुपारी ३ वाजेनंतर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. हरिहर गडावर क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक पोहोचल्यास तेथे चेंगराचेंगरीसारखे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेऊन येथेही प्रवेशबंदीचा नियम लागू केला आहे.

सकाळी गडावर पोहोचलेल्या पर्यटकांना दुपारी ३ वाजेनंतर खाली उतरणे बंधनकारक असणार आहे. कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून वन विभाग अधिक सतर्क झाला आहे.

यासाठी घेतला निर्णय

गेल्या रविवारी दुगारवाडी धबधब्यावरुन देवळाली कॅम्पचा अमित शर्मा हा १७ वर्षीय युवक वाघ नदीत वाहून गेला. तसेच कळवण तालुक्यातील सप्तशृंग देवीच्या गडाशेजारी असलेल्या मार्कंडेय पर्वतावर सोमवारी दरड कोसळून दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. येथेही मर्यादेपेक्षा जास्त नागरिक एकत्र आल्याने ही दुर्घटना घडली. या पार्श्वभूमीवर वन विभागाने सतर्कता बाळगत प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे.

पर्यटकांसाठी सूचना

- सेल्फीच्या नादात फार अवघड ठिकाणी जाण्याचे धाडस करू नका

- किल्यांवरुन पाय घसरण्याची शक्यता लक्षात घेऊनच वेग ठेवा

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

- विनाकारण ‘स्मार्ट’ पणा दाखवून पाण्यात जाण्याचा मोह टाळा

- गर्दी होणार नाही यादृष्टीने वेळीच निघण्याचा विचार करा

- पर्यटनाचा आनंद घेताना मर्यादांचे पालन करा

"पर्यटकांचा ओघ सुरु झाल्याने गर्दी होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भातील सूचना दिल्या असून, शनिवार व रविवारी पर्यटकांची गर्दी होणाऱ्या ठिकाणी हे नियम लागू केले आहेत." - राजेंद्र पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, त्र्यंबकेश्वर

"अंजनेरी येथे पर्यटकांची जास्त गर्दी होऊ नये यासाठी मर्यादित पर्यटकांनाच वरती जाण्याची परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत. पर्यटकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे." - वृषाली गाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT