Gold Purchase esakal
नाशिक

Gold Purchase : सोनं खरेदी करायचंय? मग ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : केंद्र सरकारने सोने खरेदीच्या नियमांत १ एप्रिलपासून बदल केला असून, यापुढे ४९ हजार ९९९ रुपयांचेच सोने रोखीने खरेदी करता येईल. ५० हजार किंवा त्याहून अधिक किमतीचे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ओळखपत्र (केवायसी) अनिवार्य करण्यात आले आहे.

सध्या सुवर्णकार पेढ्यांमध्ये याबाबत ग्राहकांत जनजागृती केली जात आहे. (Now identity card will required to buy gold above 50 thousand Nashik News)

यापूर्वीच्या नियमांनुसार दोन लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सोने खरेदी करताना आधारकार्ड व पॅनकार्ड अनिवार्य होते. या नियमांत बदल करून आता १ एप्रिलपासून ही मर्यादा ५० हजारांपर्यंत खाली आणली आहे.

त्यामुळे ग्राहकांना सजग करण्याचे काम सध्या सोने पेढ्यांमधे केले जात आहे. दरम्यान, सोन्याच्या काळाबाजारीला यामुळे आळा बसणार असून, यापुढे प्रत्येक कुटुंबात खरेदी केलेल्या सोन्याचा तपशील सरकारकडे असणार आहे.

शिवाय सराफांनी ग्राहकांकडून मोड खरेदी करताना त्या ग्राहकाचे आधार व पॅनकार्डबरोबरच १० हजार रूपयांपेक्षा अधिक रक्कम धनादेशाने द्यावी, अशा सक्त सूचना भारत सरकारने जारी केल्या आहेत.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

"सरकारच्या कायद्याचा व नियमांचा आम्ही सन्मान, आदर करतो. दोन लाखापर्यंत मर्यादा होती ती ठीक होती. या संदर्भात पुनर्विचार व्हायला हवा. पन्नास हजारांची मर्यादा किमान एक लाखांपर्यंत यायला हवी. या संदर्भात आमची ग्राहकांमध्ये जनजागृती सुरू आहे."

-राहुल महाले, अध्यक्ष, नाशिक रोड सराफ असोसिएशन. चष्मा व गुलाबी सदरा

"या नियमामुळे व्यवहारात चोखपणा येऊन शासनाकडे सोने खरेदी करणाऱ्यांची माहिती राहील. शिवाय सोन्याची काळाबाजारी होणार नाही. मात्र, किमान एक लाखपर्यंत तरी रोख मर्यादा करायला हवी होती. ५० हजारपर्यंत गुंतवणूक रोख स्वरूपात केल्यामुळे सामान्य माणसाची गुंतवणूक अधिक सुरक्षित होईल." -कपिलदेव शर्मा, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC Success Story: जिद्द, मेहनत आणि धाडसी निर्णय; यूपीएससी आयएफएस परीक्षेत अभिषेक कत्ते यशस्वी, देशसेवेची ओढ ठरली यशाची गुरुकिल्ली..

Latest Marathi News Live Update : NEET पेपरफुटीचं प्रकरण तापलं, पुण्यात NSUI कडून आंदोलन, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

सहा महिन्यात विजय यांचं सरकार कोसळणार, स्टॅलिन पुन्हा मुख्यमंत्री होणार; आमदाराचा मोठा दावा? राजकारण तापलं

Leopard Attack: गंगापूर तालुक्यात बिबट्याचा हल्ला; शेतकऱ्याच्या वासराला ठार केल्याने भीतीचे वातावरण, शेतकरी हवालदिल..

Parbhani News: परभणीत एसटी बसला दीड किलोमीटरचा फेरा वाहतूक कोंडीवर उपाय नाही, उलट प्रवाशांचा वेळ - इंधन वाया

SCROLL FOR NEXT