Nrityali Bharatanatyam Academy medal winning dancer 
नाशिक

Nashik News: नाशिकच्या नृत्यालीने फडकावला अटकेपार झेंडा

प्रतीक जोशी

Nashik News: सिंगापूर येथील एसीएससी फेथ सेंटर परफॉर्मिंग आर्ट्स येथे झालेल्या नृत्य स्पर्धेत नाशिकच्या नृत्याली भरतनाट्यम अकादमीने सुवर्णपदक प्राप्त करत अटकेपार झेंडा फडकावला आहे.

१२ देशांतून आलेल्या संघांच्या शंभरहून अधिक सादरीकरणांमधून नृत्यालीच्या संघांनी अनुक्रमे सुवर्ण व रजत पदकावर आपली मोहोर उमटवत यश संपादन केले. (Nrityali Bharatnatyam Academy of Nashik won gold medal in dance competition held in Singapore news)

यास वैयक्तिक ३ सुवर्ण, २ रजत व १ कांस्यपदके देखील पटकावली. स्पर्धेत भारतीय लोकनृत्य व शास्त्रीय नृत्य या दोन्ही प्रकारांत सादरीकरण करायचे होते. नृत्यालीच्या सुवर्णपदक विजेत्या संघाने घुमर हा लोकनृत्य प्रकार व महिषासुरमर्दिनी स्तोत्रावर शास्त्रीय नृत्य असे एकत्रीकरण करून सादरीकरण केले.

तर रजतपदक पटकावणाऱ्या संघाने कृष्ण व महाभारत या संकल्पनेवर आधारित नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली. वैयक्तिक सादरीकरणात खुशबू महाजन, खुषी कोळंबे, निरवी गिते यांनी सुवर्ण, समृद्धी जाधव, प्रिया करंदीकर यांनी रजत तर बबली बॅनर्जी यांनी कांस्य पदक पटकावले. २०१९ मध्ये इटली नृत्यालीने वर्ल्ड कप जिंकला होता. त्यांच्या या यशाने शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. नृत्यालीचे यश देशांसह नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT