Corona Updates News Nashik esakal
नाशिक

Corona update : ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत 16ने घट

अरूण मलाणी

नाशिक : सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन बाधितांच्‍या तुलनेत कोरोनामुक्‍त रुग्‍णांची संख्या अधिक राहिल्‍याने किरकोळ प्रमाणात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्या घटली आहे. बुधवारी (ता.६) जिल्ह्यात चाळीस रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह तर ५६ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत सोळाने घट झाली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात ३६६ बाधितांवर उपचार सुरु आहेत. (number of active patients decreased by 16 Nshik corona update news)

बुधवारी नाशिक महापालिका क्षेत्रात ३२, नाशिक ग्रामीण भागात पाच मालेगाव महापालिका क्षेत्रात एक तर जिल्‍हा बाहेरील दोन रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. सध्या नाशिक महापालिका क्षेत्रात १९०, नाशिक ग्रामीण भागात दीडशे, मालेगावला दहा, जिल्‍हा बाहेरील सोळा बाधितांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. सक्रिय रुग्‍णांमधील अवघ्या तेरा रुग्‍णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळलेली आहेत. दरम्‍यान आत्तापर्यंत वाढत असलेला पॉझिटिव्‍हीटी दर काही प्रमाणात कमी झाला आहे. बुधवारी जिल्ह्याचा पॉझिटिव्‍हीटी दर २.१५ टक्‍के राहिला. प्रलंबित अहवालांची संख्या वाढती असून, सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार १०७ अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणमधील सर्वाधिक ९८९, नाशिक शहरातील ६५, मालेगावच्‍या ५३ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा लागून होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

SCROLL FOR NEXT