GST crime latest marathi news esakal
नाशिक

GST चुकवेगिरी प्रकरणी एकाला अटक; 85 कोटींची बनावट बिले

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकमध्ये बोगस नावाने कंपनी सुरू करून, त्या माध्यमातून कंपनीमालकाने मुंबईतील बनावट कंपन्यांकडून ८५ कोटींची खोटी बिले घेऊन जीएसटी चुकवेगिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाच्या (जीएसटी) नाशिक कार्यालयाच्या अन्वेषण शाखेने फारूख रहीम खान यास सोमवारी (ता. १) अटक केली. (One arrested in GST evasion case 85 crore fake bills Nashik crime Latest Marathi News)

संशयित फारुख रहीम खान याने मे. युनायटेड स्टील ट्रेडर्स या नावाने बोगस कंपनी सुरू केली होती. या कंपनीच्या माध्यमातून खान याने वस्तूंची खरेदीशिवाय मुंबईतील बनावट कंपन्यांकडून ८५ कोटींची खोटी बिले घेतली अन्‌ त्या बिलांचा वापर करून १३ कोटींची वजावट प्राप्त केली.

यातून संशयित खान याने जीएसटीच्या २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन करीत शासनाची कर चुकवेगिरी केली आहे. सदरील बाब जीएसटीच्या नाशिक कार्यालयातील अन्वेषण शाखेने केलेल्या तपासात निष्पन्न झाली आहे.

या प्रकरणी अन्वेषण शाखेने संशयित खान यास सोमवारी (ता. १) अटक केली आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने संशयित खान याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. सदरील कारवाई अन्वेषण शाखेचे प्रमुख राज्यकर उपायुक्त चेतन डोके यांच्या आधिपत्याखाली करण्यात आली.

यासाठी नाशिक क्षेत्राचे अपर राज्यकर आयुक्त सुभाष एंगडे, नाशिक विभागाचे राज्यकर सहआयुक्त (प्रशासन) हरिश्‍चंद्र गांगुर्डे यांचे मार्गदर्शन लाभले.

वर्षातील २९ वी कारवाई

खोटी बिले देऊन अथवा घेऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणाऱ्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाच्या विशेष मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाच्या अन्वेषण शाखांमार्फत कारवाई केली जात आहे.

अशा कारवाईतून महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर विभागामार्फत राबविण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत ही या वर्षातील २९ वी कारवाई आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Boat Accident : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Maharashtra Latest News Update: हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

SCROLL FOR NEXT