crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : सदोष मनुष्यवधप्रकरणी एकास कारावास

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला सदोष मनुष्यवधप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीत पाणी भरण्यावरून झालेल्या वादातून झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला सदोष मनुष्यवधप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. ()

घनश्याम देविदास मोरे (३६, रा. रामकृष्णनगर, चुंचाळे शिवार, अंबड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर मृताचे नाव ग्यानेंद्रकुमार रामसेवक वर्मा आहे. २५ मे २०१८ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास अंबड एमआयडीसीतील कंपनीत आरोपी मोरे याने राजकिशोर यास मारले होते.

त्याचा जाब विचारण्यासाठी राजकिशोर, मृत ग्यानेंद्रकुमार हे गेले असता, आरोपीने ग्यानेंद्रकुमार यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अंबड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल होता. अंबडचे उपनिरीक्षक व्ही.जे. पवार यांनी गुन्ह्याचा तपास करीत सबळ पुराव्यांसह दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

जिल्हा व सत्र न्यायधीश बी. व्ही. वाघ यांच्यासमोर खटला चालला. सरकारी सहायक अभियोक्ता भानुप्रिया पेठकर यांनी कामकाज पाहिले. न्यायालयाने आरोपीला सदोष मनुष्यवधप्रकरणी दोषी ठरवून सहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून सहायक उपनिरीक्षक अण्णा कुवर, तनजीम खान यांनी पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Rahul Dravid Son: ४८ ब्राऊंड्री अन् ४५९ धावा... द्रविडच्या धाकट्या लेकाच्या कारनामा; KSCA कडून झाला मोठा सन्मान

पालघरमधील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर! डहाणूत सामान्य, जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला तर पालघरमध्ये ओबीसीचे आरक्षण

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT