options  nashik
नाशिक

रांगडा कांदा लागवडीला वेग; शेतकऱ्यांकडून नियोजन सुरू

प्रमोद सावंत

येसगाव (जि. नाशिक) : गाव व परिसरात रांगडा कांदा लावण्याची लगबग सुरू झाली आहे. कांदा हे नगदी पीक आहे. ते वर्षातून तीनदा घेता येते. खरिपात पावसाळी, लेट खरीप हंगामात हा लाल कांदा व उन्हाळ भगवा कांदा असे कांद्याचे उत्पादन शेतकरी त्याच्या नियोजनाप्रमाणे घेत असतात. रांगडा कांदा करण्यासाठी शेतकरी शेत राखून ठेवतात. तर बऱ्याच शेतकऱ्यांनी बाजरीचे पीक घेतल्यानंतर खरीप हंगामातील लाल कांद्याची लागवड करतात. साधारणत: कांद्याचे बी जुलै किंवा ऑगस्टमध्ये गादी वाफ्यावर तयार करतात व सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या आत या लाल कांद्याची लागवड करतात.

रांगडा कांद्यासाठी वाफा पद्धतीचा उपयोग

यांत्रिकी साधनांमुळे ट्रॅक्टरने शेतीकामांना वेग येतो. रांगड्या कांद्याचे बियाणे वेगळे नसून पावसाळी लाल कांद्याची बी यासाठी वापरतात. अनेक शेतकरी प्रमाणीत बियाणे वापरतात. परंतु, बियाणे खराब निघाल्यास जोड कांदे, डोंगळे निघणे, कांद्याची वाढ न होणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे उत्पादनात घट येते. यासाठी अनेक शेतकरी घरचे उत्कृष्ट बियाणे तयार करतात. या कांद्यावर वातावरणाचा परिणाम झाल्यास कांद्याच्या पातीवर रोग पडतो. रांगडा कांद्यासाठी बहुतेक शेतकरी वाफा पद्धतीचा उपयोग करतात. तर उर्वरित खरिपातील वरंबा पद्धत व सिंचन पद्धतीचाही उपयोग करतात.

मजुरांची जमवाजमव...

सध्या मजूर टंचाई भासत असल्यामुळे अनेक शेतकरी इतर गावांतून मजुरांची स्वखर्चाने ने-आण करतात. शेतकऱ्यांना वाहनांची सोय करावी लागते. अनेक गावांमध्ये मक्ता पद्धतीने कांदालागवड केली जाते. त्यामुळे वेगवेगळ्या गावांचा दर वेगवेगळा असू शकतो. तर काही गावांमध्ये वाफ्यांवर दर ठरविला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT