Chagan Bhujbal Sakal
नाशिक

नाशिक : जिल्हा नियोजनची आज ऑनलाईन बैठक

कोरोना अधिकाऱ्यांच्या पथ्याव; अखर्चिक निधी, असमान वाटपाची चर्चा गुलदस्त्यातच

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा नियोजन समितीची(nashik district committee) उद्या शनिवारी (ता ८) पालकमंत्री छगन भुजबळ(chagan bhujbal) यांच्या अध्यक्षतेखाली आॅनलाईन बैठक होणार आहे. जिल्ह्यातील दोन्ही खासदारांसह जिल्हा नियोजन आधिकारी आणि अनेक वैद्यकीय आधिकारी पॉझिटिव्ह असल्याने आॅनलाइन बैठक होणार आहे. त्यामुळे असमान निधी वाटप, अखर्चिक निधी, भुजबळ- कांदे वादाचे विषय गुलदस्त्यात राहणार आहे.बैठकीत जिल्हा वार्षिक योजना, सर्वसाधारण योजना, आदिवासी उपाययोजना, अनुसूचित जाती उपाययोजनाबाबत २०२१-२२ अंतर्गत डिसेंबर २०२१ अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात येणार आहे. २०२१-२२ अंतर्गत पुनर्वियोजन प्रस्ताव व २०२२-२३ अंतर्गत प्रारूप आराखडा यावर चर्चा होऊन २६ नोव्हेंबर २०२१ च्या नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त वाचुन कायम करण्यावर चर्चा होईल.

४०० कोटी अखर्चिक

नियोजन विभागाला ४७० कोटींचा निधी प्राप्त झाला असून, त्यातील ४०० कोटींचा निधी पडून आहे. १० महिन्यात अवघे ७० कोटी रुपये विकास कामांवर खर्च झाले. त्यामुळे मार्च अखेरपर्यत म्हणजे अडीच महिन्यात ४०० कोटी रुपये खर्च करण्याचे आव्हान आहे. त्यात, जिल्ह्यातील सहा तालुक्यांत नगरपंचायत निवडणुकांची आचारसंहिता सुरु आहे.

कोरोना पडतो पथ्यावर

जिल्ह्यातील दोन्ही खासदार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, जिल्हा नियोजन अधिकारी जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्यासह जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेचे चार वैद्यकीय अधिकारी पॉझिटीव्ह आहेत. पालकमंत्र्यांच्या आणि जिल्हा यंत्रणेतील ताफ्यातील काहींना कोरोनाची लक्षणे आहेत. एकुणच निमंत्रितांपैकी बहुतेक जण पॉझिटीव्ह असल्याने कोरोना निर्बंधाच्या आड अनेक वादाच्या विषयावर चर्चा टाळून विषय गुलदस्त्यात राहणार आहे.

म्हणून जिल्हा नियोजन समितीची बैठक प्रशासनाच्या पथ्यावर पडणार आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या योजनांवर चर्चा होत असली तरी, निधी वाटप हा तीन महिन्यांपासून वादाचा विषय झाला आहे. समितीचे अध्यक्ष असलेल्या पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आधिकारावर आक्षेप घेत शिवसेनेने आमदार सुहास कांदे यांनी थेट न्यायालयात धाव घेतली आहे. निधीतील असमान वाटपावरुन मागील बैठकीत वादावादी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT