An open theater built at the Dadasaheb Phalke Memorial esakal
नाशिक

Phalke Smarak : लावणी महोत्सवाचे ‘वाजले बारा’; फाळके स्मारकातील खुले नाट्यगृह बंद!

सकाळ वृत्तसेवा

Phalke Smarak : चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मारकात कलारसिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या लावणी महोत्सवाचे बारा वाजले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हा महोत्सव बंद पडल्यामुळे येथे फक्त स्टेजचा लोखंडी सांगडा उभा दिसतो.

त्याच्या साक्षीला असलेला लेझर शोदेखील बंद झाल्यामुळे सफेद भिंतीकडे बघूनच कलारसिक ‘गेले ते दिवस’, असे म्हणत येथून काढता पाय घेतात. (Open theater in Phalke memorial closed nashik news)

दादासाहेब फाळके स्मारकाची निसर्गाच्या सानिध्यात उभारणी करताना कला, सिनेमा, नाट्यसेवा, नृत्यकला आणि आधुनिक चित्रपटांचा प्रवास उलगडणारे मीनी थिएटर यांचा अनोखा संगम घडवला होता.

त्यामुळे फाळके स्मारकाने अल्पावधीत सर्वांगिण लोकप्रियता मिळवली. शिखरावर पोचलेल्या फाळके स्मारकाला कोरोनाकाळात येथे अवकळा लागली आणि एकामागोमाग अनेक गोष्टी बंद झाल्या. यात कलादालन बंद झाले.

त्यातील चित्रेही काढून घेण्यात आली. येथे फक्त भिंती त्यांच्या आठवणी सांगून जातात. भव्य अशा लेझर शोच्या शेजारीच लावणी महोत्सवाचा कार्यक्रम व्हायचा. येथे कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण तर करायचे शिवाय, प्रेक्षक समोर आकाशाच्या छताखाली बसायचे.

त्यांची आसन व्यवस्था ही विशिष्ट पद्धतीने केलेली होती. त्यामुळे निसर्गाला कुठेही हानी पोचणार नाही, याची पुरेपुर काळजी घेऊन या लावणी महोत्सवाच्या स्टेजची रचना करण्यात आलेली होती. खुले नाट्यगृह तीन वर्षांपासून बंद झाले आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

त्यामुळे स्टेज म्हणून वापरासाठी उभा केलेला लोखंडी सांगडाही पावसाच्या पाण्यात भिजून गंजण्यास सुरवात झाली आहे. त्याचा योग्य वापर व्हायला हवा. अन्यथा त्यासाठी केलेल्या खर्चावर पाणी सोडण्याची वेळ महापालिकेवर येणार आहे. चित्रही काढून नेले

फाळके स्मारक लॉकडाउन झाल्यानंतर येथील कलाकारांनी कलादालनातून आपले चित्रही काढून नेली. त्यामुळे आता रिकामे कलादालने बघायला लोकांना आवडत नाहीत. त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये म्हणून त्यांना कुलूप लावले आहे.

चित्रांअभावी विचित्र दिसणारी कलादालने सुरू होतील की नाही, याबाबत सध्यातरी ठामपणे कोणी सांगत नाही.

जोडप्यांना पुन्हा परवानगी

फाळके स्मारकात जोडप्यांना बसण्यास काही दिवसांपूर्वी परवानगी नाकारण्यात आली होती. महापालिकेचे आयुक्त बदलले की नियम बदलतात. असाच काहीसा प्रकार घडला आणि युवक, युवतींना बसण्याची परवानगी महापालिकेने दिली. त्यामुळे निसर्गरम्य वातावरणात सध्या भलतीच ‘पाखरे’ नजरेस पडतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT