नाशिक

पहाटेची गुलाबी थंडी, सुरातला गोडवा

CD
फोटो : B05088 डीजीपीनगर : रविशंकर मार्गावर पाडवा पहाट मैफिलीत गीत सादर करताना प्रांजली बिरारी-नेवासकर. --- रविशंकर मार्गावर संगीताची मेजवानी मान्यवरांच्या उपस्थितीत पाडवा पहाट मैफील सकाळ वृत्तसेवा डीजीपीनगर, ता. १३ : गुलाबी थंडीची चाहूल, पहाटेचे प्रसन्न वातावरण आणि संगीताचे सुरेल स्वर अशा त्रिवेणी संगमात रविशंकर मार्गावर ‘भाऊबीज-पाडवा पहाट संगीत मैफल’ उत्साहात पार पडली. संगीत, स्नेह आणि खाद्यसंस्कृतीच्या या महोत्सवाने उपस्थितांचे मन जिंकले. पूर्व विभागाच्या सभापती मंगला नन्नावरे आणि अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष प्रकाश नन्नावरे यांच्यातर्फे मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका प्रांजली बिरारी-नेवासकर आणि सहगायक संदीप थाटसिंगार या मैफिलीचे मुख्य आकर्षण ठरले. स्थानिक कलावंत निकिता पाटील यांनी सादर केलेल्या गीताला रसिकांची विशेष दाद मिळाली. भक्तिगीत, अभंग आणि भावगीतांच्या या मेजवानीत अमोल पाळेकर, कन्हैया खैरनार, देवानंद पाटील, रोहित कटारे आणि चैतन्य पाळेकर यांच्या वादनाने मैफील अधिकच बहारदार केली. सचिन तिडके यांचे ध्वनी संयोजन, धनेश जोशी यांचे सूत्रसंचालन आणि सहगायिका वैष्णवी अश्विनी यांच्या साथीने कार्यक्रमात रंगत आणली. या वेळी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, गटनेते श्याम बडोदे, जगन पाटील, नगरसेविका संध्या कुलकर्णी, रूपाली निकुळे, दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे, नगरसेवक चंद्रकांत खोडे, तसेच माजी नगरसेवक यशवंत निकुळे, सुनील खोडे व वैभव कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. मैफिलीच्या सांगतेनंतर झणझणीत मिसळ पार्टीचा उपस्थित लोकप्रतिनिधींनी मनमुराद आनंद घेतला आणि राजकीय गप्पा मारत दीपावलीचा आनंद द्विगुणित केला. ओबीसी भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन नन्नावरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JEE Advanced 2027 ची तारीख जाहीर; 23 मे रोजी होणार परीक्षा, IIT दिल्लीकडे आयोजनाची जबाबदारी

रेल्वे प्रवासात बदल! आता ट्रेनमधील RAC सुविधा बंद होणार? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेणार

Latest Marathi News Live Update: दूध विक्रीच्या दरामध्ये मोठी वाढ, प्रति लिटर ४ रुपयांनी महागले

Ramayana Box Office : अवघ्या ८ दिवसांत बॉक्स ऑफिसवर इतिहास! 'रामायण'ची १००० कोटींच्या क्लबमध्ये दणदणीत एन्ट्री; आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांची यादी पाहा!

Touch Wood Tradition: 'टच वुड' म्हणताच लाकडाला हात का लावतात? जाणून घ्या यामागचं रंजक कारण

SCROLL FOR NEXT