Bulls Pair esakal
नाशिक

Nashik : विहिरीत पडून बैलजोडीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

निवाणे (जि. नाशिक) : शेतात नांगरणी (Plowing) सुरू असताना बैलाचा (bull) पाय घसरून सर्जा- राजाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. ३०) घडली. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. (pair of bulls died after falling into a well at nivane Nashik News)

येथील पशुपालक दिलीप लक्ष्मण आहेर यांनी अर्ध्या वाटणीने पुंजाराम सोनवणे यांची शेती घेतली आहे. या शेतात नांगरणी सुरू असताना विहिरीच्या बाजूचे गवत खाण्यास एक बैल पुढे सरसावला. मात्र, तेथील माती ढासळल्याने बैलाचा पाय घसरला. त्या वजनाने औतासह दुसरा बैल देखील विहिरीत कोसळला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दिलीप आहेर यांची तारांबळ उडाली. त्यांनी कसातरी आपला जीव वाचविला. मात्र, लाखमोलाची बैलजोडी डोळ्यासमोर विहिरीत पडल्याने त्यांचा थरकाप उडाला. ७० फूट खोल विहिरीत पंधरा ते सोळा फूट पाणी होते. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी तत्काळ धाव घेत जेसीबी, ट्रॅक्टरच्या साहाय्याने बैलांना काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. परंतु, पाणी व विहीर खोल असल्यामुळे बैलांना वाचविण्यात यश आले नाही.

दिलीप आहेर यांनी मागीलवर्षी एक लाख रुपयांची बैलजोडी मोठ्या कष्टाने पैसे जमवून घेतली होती. या घटनेमुळे आहेर कुटुंबीय हादरून गेले. तलाठी डी. चौधरी, पोलिस पाटील दादा खरे, कळवणचे पशुधन विकास अधिकारी यांनी घटनेचा पंचनामा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Play Off Scenario: गुजरात टायटन्सचा सलग पाचवा विजय! सनरायझर्स हैदराबादला नमवून POINT TABLE मध्ये अव्वल, अनपेक्षित कलाटणी

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सच्या संघात बदल... प्ले ऑफच्या शर्यतीसाठी मिळालं बळ... पुण्याच्या रामकृष्ण घोषच्या जागी एन्ट्री

Triple Accident : रजापूर शिवारात तिहेरी अपघात; वाळू वाहतूक करणारा हायवा पलटी, दोन कारची धडक, चार ते पाच जण किरकोळ जखमी

Amit Satam: पंतप्रधानांच्या 'इंधन बचती'ला मुंबई भाजपचा हरताळ; अमित साटम यांचा २५ गाड्यांचा 'शाही' ताफा वादाच्या भोवऱ्यात!

GT vs SRH Live : टप्पा खाऊन आऊट... अभिषेक शर्मा विचित्र पद्धतीने बाद झाला, कागिसो रबाडाला हसू आवरेना... Video Viral

SCROLL FOR NEXT