Nashik News
Nashik News  esakal
नाशिक

Nashik News : घोटीत स्मशानभूमीजवळ आढळला अर्धवट जळालेला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा

घोटी : घोटी शहरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास एक अनोळखी व्यक्तीचा अर्धवट जळालेल्या स्थितीत युवकाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह घोटी स्मशानभूमी परिसरात आढळल्याने हा घातपाताचा प्रकार की आत्महत्या की आणखी काही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

मृतदेहाची ओळख पटविणे सुरू आहे. घोटी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेबाबत कोणालाही काही माहिती असल्यास घोटी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व घोटी पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. (Partially burnt dead body found near Ghoti graveyard Nashik News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

घोटी शहरात दारणा नदीलगत असलेल्या स्मशानभूमी शिवारात एका युवकाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत पडून असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना कळविली. पोलिस पथकाने पाहणी केली असता अंदाजे २५ ते ३० वयोगटातील युवकाचा तो मृतदेह होता.

युवकाच्या डाव्या हातावर R.M तर उजव्या हातावर जिविता N.R असे गोंदलेले असल्याचे निदर्शनास आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलीप खेडकर यांच्यासह उपनिरीक्षक संजय कवडे आदींसह कर्मचारी तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Malviya: "आता राहुल गांधी दलितांची माफी मागणार का?" रोहित वेमुला प्रकरणी अमित मालवीय यांचा सवाल

Nepal: नेपाळचे मोठे धाडस! 100 रुपयांच्या नोटेवर छापणार नवा नकाशा; भारताच्या 'या' भागांचा समावेश

Murder In Mahim: पत्रकार, पोलीस अधिकारी अन् मर्डर मिस्ट्री; 'मर्डर इन माहीम'चा ट्रेलर रिलीज, सीरिज 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT